Jintur News : शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत वाहनासह कडबा जळून खाक

कडब्यासह आयशर जळून खाक झाल्याची घटना सोमवारी जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथे घडली.
truck fire with animal fodder kadba
truck fire with animal fodder kadbasakal

जिंतूर - कडब्याची वाहतूक करताना आयशर वाहनाचा विद्युत तारेला झालेल्या घर्षणामुळे शॉर्ट सर्किट होऊन कडब्यासह आयशर जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (ता.०८) संध्याकाळी सहाच्या जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथे घडली.

प्राप्त माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथून आयशर वाहन (क्र. MH 07 C 5329) कडबा भरून जोगवाडा गावातून जात असताना लोंबकळणाऱ्या तारेला धक्का लागल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन वाहनातील कडब्याने पेट घेतला. भरवस्तीत कडब्याने पेट घेतल्यामुळे मोठे नुकसान होईल म्हणून चालकाने प्रसंगावधान राखत आयशर वाहनाला गावाच्या बाहेर नेऊन उभे केले यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान,गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नसल्याने वाहनासह कडबा जळून खाक झाला. एव्हाना घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पथकाने हजर होऊन आग आटोक्यात आणली. तोपर्यंत कडब्यासह आयशर पूर्णतः जळून खाक झाले. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com