कर्जमाफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

फुलंब्री : औरंगाबाद व फुलंब्री तालुक्यातील तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून पिक कर्ज उपलब्ध करून देणे. बोंड अळीचे नुकसान भरपाई देणे. तसेच संपूर्ण कर्जमाफी करण्याकरिता सोमवारी (ता.2) रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना माजी आमदार डॉ. कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. 

यावेळी औरंगाबाद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामराव शेळके, फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप बोरसे, फुलंब्री खरेदी-विक्री संघाचे चेअरमन आबाराव सोनवणे, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पुंडलिकराव जंगले, औरंगाबाद मार्केट कमिटीचे संचालक राहुल सावंत, औरंगाबाद खरेदी-विक्री संघाचे संचालक अशोकराव काकडे, औरंगाबाद पंचायत समिती सदस्य सुभाष भालेराव, पुरुषोत्तम पाटील गाडेकर आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Appeal to District Collector for Lending