बीड जिल्ह्यात खरीप व रब्बीसाठी पीकविमा कंपनीची नियुक्ती करा -जयदत्त क्षीरसागर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

खरीप आणि रब्बी हंगामात पिकांसाठी पीकविमा भरणे गरजेचे आहे. विमा भरला तरच शेतकऱ्यांचा फायदा होईल. यासाठी विमा कंपनीची नियुक्ती करावी, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

बीड - जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामात पिकांसाठी पीकविमा भरणे गरजेचे आहे. विमा भरला तरच शेतकऱ्यांचा फायदा होईल. यासाठी विमा कंपनीची नियुक्ती करावी, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 

गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी पीकविमा स्वीकारण्यात आला. त्यानंतर रब्बी हंगामासाठी बीड जिल्ह्यासह इतर जिल्हा समूहाकरिता अल्प मुदतीची ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यास प्रतिसाद न भेटल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या जिल्ह्यात साडेआठ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपात कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका या पिकांची लागवड होईल, असा अंदाज आहे.

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

जिल्ह्यात सातत्याने पावसाचे प्रमाण अनियमित असून कधी दुष्काळी परिस्थिती, तर कधी गारपीट; तसेच अतिवृष्टी देखील होते. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याकरिता पीकविमा भरणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे; तसेच यावर्षी रब्बी हंगामातही चार लाख हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी होऊ शकते. यासाठी देखील शेतकऱ्यांना पिकांचा विमा भरणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी पीकविमा कंपनीची नेमणूक करावी, अशी मागणी जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appoint a crop insurance company for kharif and rabi in Beed district - Jaydatta Kshirsagar