धार्मिक स्थळी सुरक्षा समिती नेमा

सुशांत सांगवे
सोमवार, 6 मे 2019

लातूर : भक्तांची सुरक्षितता अधिक महत्वाची आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक धार्मिक स्थळी सुरक्षा समिती नेमा. धार्मिक स्थळांच्या पुढे वाहने थांबणार नाहीत, याची काळजी घ्या. प्रार्थनेसाठी आलेल्या प्रत्येकाची तपासणी करा, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल (नांदेड परिक्षेत्र) यांनी सोमवारी येथे केले.

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 'दहशतवाद विरोधी उपाययोजना' या विषयावर मुत्याल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलीस अधीक्षक हिमंत जाधव, सचिन सांगळे उपस्थित होते.

मुत्याल म्हणाले, धार्मिक ठिकाणी किंवा उरूस, जयंती, महापूजा, मिरवणूक अशा ठिकाणी अधिक जागरूक राहायला हवे. धार्मिक स्थळी पिशवी, बाटली, वायर, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा वस्तू सोबत आणू नये. प्रवेशद्वारावर प्रत्येकाची तपासणी व्हावी. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा हवी. सीसीटीव्ही लावण्याबरोबरच घटना घडू नये म्हणून सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहण्यासाठी माणूस नेमा. धार्मिक स्थळाशेजारी विक्रेते, भिकारी यांची विनाकारण गर्दी होणार नाही, हेही पहा.

"धार्मिक स्थळीच नव्हे तर शाळा, महाविद्यालय, संस्था, शासकीय कार्यालय येथे योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे. उत्सवाच्या काळात कार्यकर्त्यांनी पोलिसांना मदत करावी. तुमच्याशिवाय पोलीस अपुरा आहे." 
- प्रकाश मुत्याल, विशेष पोलीस महानिरीक्षक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: appoint security council at religious places says IG Prakash Mutyal