ऑनलाईन आणि वैद्यकीय  पासेससाठी बीडला अधिकाऱ्यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

बीड जिल्ह्याबाहेर जाणेसाठी अथवा बीड जिल्ह्यात येण्यासाठीच्या ऑनलाईन पाससाठी (https://beed.gov.in) या संकेतस्थळावर नोंदी करावी तसेच नायब तहसीलदार श्रीकांत निळे (९५५२४६३२७७) यांच्याशी संपर्क करावा.

बीड - जिल्ह्यातील आणि बाहेर अडकलेल्या नागरिकांना ऑनलाईन आणि वैद्यकीय कारणांसाठी देण्यात येणाऱ्या पासेससाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागरिकांनी केवळ योग्य प्रयोजनासाठीच अधिकाऱ्यांच्या नावासमोर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थान अधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

बीड जिल्ह्याबाहेर जाणेसाठी अथवा बीड जिल्ह्यात येण्यासाठीच्या ऑनलाईन पाससाठी (https://beed.gov.in) या संकेतस्थळावर नोंदी करावी तसेच नायब तहसीलदार श्रीकांत निळे (९५५२४६३२७७) यांच्याशी संपर्क करावा. जिल्ह्यांतर्गत प्रवासाच्या पासेससाठी (covid१९. mhpolice.in) या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

नायब तहसीलदार संतोष (९३७१५४७२१७) यांना संपर्क करावा. वैद्यकीय किंवा अतितात्काळ पाससाठी नायब तहसीलदार श्रीकांत रत्नपारखी (९४२२७४५५३२) तर अत्यावश्यक कामासाठीच्या पाससाठी नायब तहसीलदार इसाकोद्यीन पाशा (९९२२१५२१६२) यांच्याशी संपर्क साधावा.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

वैद्यकीय किंवा अतितत्काळमध्ये यांना मिळणार नाही पास 

  • शेतीची औषधी/रुग्णालयीन औषधी व फवारणी औषधी आणण्यासाठी.
  • खासगी बँकांच्या कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी.
  • मशिनरी दुरुस्तीसाठी व्यक्ती किंवा साधने बाहेरून आणण्यासाठी.
  • सख्खे नातलगांव्यतिरिक्त इतरांच्या अंत्यविधीस जाण्यासाठी. 
  • आयटी कंपनीशी संबंधित कामकाजासाठी . 
  • आस्थापना कामकाजासाठी . 
  • दर महिन्याला डॉक्टरचा सल्ला घेण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी या बाबींसाठी पास देण्यात येणार नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of officers for passes in beed