निवडणुका अन्‌ मनोरंजनाचा यंदा डबल धमाका

निवडणुका अन्‌ मनोरंजनाचा यंदा डबल धमाका

औरंगाबाद - यंदा २१ फेब्रुवारीला बारावी तर १ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आणि आयपीएल क्रिकेटचा धमाका यामुळे हा महिना आणखीनच ‘हॉट’ राहणार आहे. त्यानंतर मेमध्ये विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा असा एकापाठोपाठ एक थरार राहणार आहे. 

सुरवात परीक्षेने 
यावर्षी बारावी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान होईल. तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होईल तर शेवटचा पेपर २२ मार्चला असेल. यंदा अभ्यासक्रम बदललेल्या दहावीच्या मुलांमध्ये दडपण आहे. मुलांना अभ्यासाला त्रास होऊ नये यासाठी पालक घरातील टीव्ही बंद ठेवतात. मात्र, दहावी, बारावीच्या परीक्षेनंतर मुलांसाठी मनोरंजनाचा पिटारा उघडला जाणार आहे. 

आयपीएलचा थरार 
टी-२० क्रिकेट म्हणजे थरार असतो. आयपीएलचा बारावा हंगाम २३ मार्चपासून सुरू होऊन तब्बल १२ मेपर्यंत चालणार आहे. त्यात १६२ रंगतदार सामने पाहता येणार आहेत. यंदा प्रत्येक संघाची फेररचना केल्याने उत्कंठा वाढलेली आहे. त्यामुळे आतापासूनच आयपीएलच्या बाराव्या हंगामाची चर्चा आहे. यावर्षी महिलांच्या क्रिकेट संघाचीही आयपीएल होणार असल्याचे संकेत अाहेत.

रणधुमाळी 
लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सर्वांत मोठा सोहळा.  राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरु केलेली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. ही निवडणूक किती टप्प्यात होईल, अखेरचा टप्पा कधी? हे जाहीर होईल याचे गणित सध्या सुरू आहे. मात्र, किमान मेपर्यंत देशभर इलेक्‍शनची गरमागरमी सुरू राहणार आहे. 

क्रिकेट विश्‍वचषक  
क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजे विश्‍वातील सर्वांत मोठी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा या वर्षी इंग्लंडमध्ये खेळवली जाणार आहे. या विश्‍वचषकातील सामने ३० मेपासून १४ जुलैपर्यंत चालणार आहेत. यात एकूण ४८ सामने रंगतील. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्डसच्या मैदानात होईल. म्हणजे यंदा १९८३च्या वर्ल्डकपच्या आठवणी जाग्या होणार यात शंका नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com