डमी परीक्षार्थी प्रकरणात आज दोघांना अटक

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 8 मे 2018

मंगळवारी (ता. 8) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता विशाल रामराव पवार (रा. राजगड तांडा, ता. किनवट) आणि लातूर बोरवटी बाळासाहेब व्यंकटराव भातलवंडे यांना अटक केली.

नांदेड - सबंध राज्यभर गाजत असलेल्या डमी परिक्षार्थी प्रकरणात सीआयडीकडून धरपकड सुरू आहे. या पथकांनी मंगळवारी दोघांना अटक केली असून त्यांना 11 मे पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. 

डमी परिक्षार्थी बसवून शासकिय सेवेत दाखल झालेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आल्यानंतर सीआयडी मार्फत राज्यभरातून विविध ठिकाणी शासकिय सेवेत दाखल झालेल्या अनेकांना अटक करण्यात आले आहे. सोमवारी 8 जणांना अटक करून रात्री उशिरा किनवट न्यायालयात हजर केले होते. परत मंगळवारी (ता. 8) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता विशाल रामराव पवार (रा. राजगड तांडा, ता. किनवट) आणि लातूर बोरवटी बाळासाहेब व्यंकटराव भातलवंडे यांना अटक केली. त्यांनाही 11 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात आजपर्यंत 35 जण अटक झाले असून जवळपास 7 जण कारागृहात आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: arrested for cheating in exams in nanded