नांदेड - मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक 

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना अटक करून त्यांच्याकडून सहा मोबाईल आणि एक दुचाकी जप्त केली. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. 21) पहाटे केली. 

नांदेड : कानाला लावलेला किंवा हातात धरुन रस्त्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला धक्का देऊन त्यांचा मोबाईल पळविणारी टोळी अटक केली. किनवट येथून दोघांना अटक करून त्यांच्याकडून सहा मोबाईल आणि एक दुचाकी जप्त केली. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. 21) पहाटे केली. 

शहरातील वेगवेगळ्या भागातून रस्त्यावर मोबाईल कानाला लावून बोलणाऱ्याचा तर काही वेळा रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीना धक्का देऊन त्यांना बेसावध करत मोबाईल पळविण्याच्या घटना वाढत होत्या. त्यातच शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीत या घटना नुकत्याच घडल्या होत्या. या दाखल गुन्ह्याच्या शोध लावण्यासाठी पोलिस उपाधिक्षक (शहर) अभिजीत फस्के यांच्या आदेशावरून पोलिस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे यांनी गुन्हे शोध पथकाचे फौजदार गोपीनाथ वाघमारे यांना सुचना दिल्या. यावरून काही संशयीतांचा शोध घेणे काम किनवट व माहूर तालुक्यात हे पथक रवाना झाले. पथकात फौजदार वाघमारेंसह शेख ईब्राहीम, मोहन हाके आणि बापुराव पांचाळ यांचा सहभाग होता. त्यांनी हा परिसर पिंजून काढत अखेर मोबाईल चोरट्यांपर्यंत पोहचले.

आरोपी साईप्रसाद दिगांबर शिरगिरे (वय 21) हा पोलिस भरतीसाठी नांदेडच्या विद्युतनगर भागात किरायाने राहत होता. त्याच्याकडे त्याचा मित्र बालाजी विठ्ठल सुर्यवंशी (वय 20) हा नेहमी येत असे. हो दोघेजण दुचाकीवरुन मोबाईल चोरत असत आणि किनवट, माहूर या आदिवासी बहूल भागात कमी किंमतीत चोरलेले मोबाईल विक्री करत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या दोघांकडून सहा किंमती मोबाईल व एक दुचाकी जप्त केली. दोघांनाही घेऊन शिवाजीनगर ठाण्यात हे पथक आले. प्रथमवर्ग न्यायाधिश श्रीमती गवई यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.  

Web Title: arrested a group of robbers who stoles mobiles in nanded