नांदेड : अट्टल दरोडेखोराला अटक

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नांदेड : भोकर, देगलूर व आंध्रप्रदेशमध्ये दरोडा टाकून पसार असलेल्या अट्टल दरोडेखोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी अर्धापूर ठाण्याच्या हद्दीतून शुक्रवारी (ता. 24) रात्री अटक केली. त्याच्याकडून तलवार, खंजर व रोख दीड हजार रुपये जप्त केले. 

नांदेड : भोकर, देगलूर व आंध्रप्रदेशमध्ये दरोडा टाकून पसार असलेल्या अट्टल दरोडेखोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी अर्धापूर ठाण्याच्या हद्दीतून शुक्रवारी (ता. 24) रात्री अटक केली. त्याच्याकडून तलवार, खंजर व रोख दीड हजार रुपये जप्त केले. 

भोकर येथे जिल्हा परिषदेच्या बाजूला असलेल्या सागर कॉलनीत 18 जूलै रोजी कापड व्यापारी बुमन्ना सायन्ना काजगेवार (वय 51) यांच्या घरात घुसून त्यांचे व त्यांच्या मुलाचे हातपाय बांधून खंजरने मारून जखमी करून अनोळखी चोरट्यांनी लुटमार केली होती. यावेळी नगदी 26 हजार व सोन्याचांदीचे दागिणे असा 56 हजाराचा एेवज लंपास केला होता. या प्रकरणी भोकर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास लावण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांना दिले. यावरून त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती हे आपले सहकारी घेऊन शुक्रवारी रात्री गस्तीवर होते.

अर्धापूर तालुक्यातील नांदुसा येथे रात्री अट्टल चोरटा लक्ष्मण पिराजी मेटकर याला अटक केली. त्याच्याकडून एख तलवार, चाकु व रोख दीड हजार रुपये जप्त केले. त्याने भोकर, महेबुबनगर, निर्मल, नारायणखेड, नरसापूर व तेलंगनामध्ये दरोडा टाकल्याची कबुली दिली. आरोपी मेटकर विरूध्द लिंबगाव, बारड, भाग्यनगर, देगलूर आदी ठिकाणी घरफोडी, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध अर्धापूर ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस यण्याची शक्यता  सहाने यांनी व्यक्त केली. 

Web Title: arrested robber in nanded