खंजर बाळगणाऱ्या दोघांना अटक

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 12 मार्च 2020

दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन खंजर जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (ता. १०) नमस्कार चौक व सखोजीनगर भागात केली. 

नांदेड : विनापरवाना बेकायदेशीररित्या हातात खंजर घेऊन परिसरात दहशत परविणाऱ्या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन खंजर जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (ता. १०) नमस्कार चौक व सखोजीनगर भागात केली. 

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत नमस्कार चौक परिसरात विनापरवानगी आपल्या हातात खंजर घेऊन परिसरात दहशत पसरवीत असणारा नामदेव विलास बसवंते (वय २०) रा. पांडूरंगनगर हा पोलिसांच्या गस्त दरम्यान सापडला. त्याला अटक करून त्याच्याकडून एक धारदार खंजर जप्त केली. पोलिस हवालदार राजकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचाआश्‍चर्यम्...! म्हैशीला जन्मला दोन तोंडासह विचित्र रेडकुस

तर दुसऱ्या घटनेत सखोजीनगर चौकात महेंद्रसिंग उर्फ आकाशसिंग करतारसिंग लांगरी (वय २५) याला अटक केली. त्याच्याकडूनही एक खंजर जप्त केले. या दोघांनी जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले. पोलिस हवालदार अशोक कुरूळेकर यांच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार श्री. पांचाळ करत आहेत. 

मारहाणीत एकजण गंभीर 

नांदेड : जुन्या वादातून एकाला रस्त्यात अडवून त्याला बेदम मारहाण करुन गालावर चाकुने मारुन जखमी केले. ही घटना चौफाळा भागातील विणकर कॉलनीत मंगळवारी (ता. १०) रात्री सात वाजता घडली. 

विणकर कॉलनीत राहणारा दत्तात्र्य शंकरराव यलमवाड (वय ३३) हा आपल्या गल्लीत काही मित्रांना बोलत थांबला होता. यावेळी जुन्या वादातून त्याला याच भागात राहणाऱ्या तिघांनी अडविले. तु आमच्या विरोधात तक्रारी करतोस काय म्हणून वाद घातला. एवढेच नाही तर त्याला थापड बुक्यानी मारहाण करून चाकुने गालावर गंभीर दुखापत केली. यात तो जखमी झाला असून त्याच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहे. उपचार घेतल्यानंतर बुधवारी (ता. ११) रात्री दत्तात्र्य यलमवाड यांनी इतवारा पोलिस ठाणे गाठले. त्याच्या फिर्यादीवुन इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार दत्तात्र्य काळे करत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested with two daggers nanded crime news