चार दिवसांपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

उंडणगाव (जि.औरंगाबाद) ः अतिवृष्टी होत असलेल्या उंडणगाव (ता. सिल्लोड) परिसरातच शासनाच्या कृत्रिम पावसाचा प्रयोग गेल्या चार दिवसांपासून होत आहे. त्यामुळे परिसरात दररोज तास अर्धा तास पाऊस पडत आहे. अंभई महसूल मंडळात आतापर्यंत एक हजार मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झालेली आहे. सततच्या पावसाने जमिनी चिभडल्या असून पिके पाण्यात तरंगत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

पावसाने नदी-नाले व विहिरीतील पाणी जमिनीच्या वर आल्याने ओला दुष्काळ परिसरात पडला आहे. दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशा तिहेरी संकटाचा सामना करता करता नाकीनऊ येत असताना यंदा दमदार पावसाने पिके जोमात होती. मात्र पाऊस एक-दोन दिवसाआड पडत असल्याने ओल्या दुष्काळाच्या गर्तेत अंभई मंडळातील गावे सापडली आहेत.

अतिपावसाने आता ओढ द्यावी, अशी आर्त आशा लागलेली असताना गेल्या चार दिवसांपासून उंडणगाव परिसरातच कृत्रिम पावसाचे विमान ढगात नळकांड्या फोडत असल्याने शेतकरी पुरते वैतागले आहेत. शनिवारी (ता. 28) दुपारी साडेचारच्या दरम्यान कृत्रिम पावसाच्या विमानाने घिरट्या घातल्या. त्यामुळे परिसरातच अर्धा तास मुसळधार पाऊस पडला.

निल्लोड मंडळात कृत्रिम पावसाची गरज!
दरम्यान, तालुक्‍यातील निल्लोड मंडळातील नदी-नाले व विहिरी पावसाळा सरत आला असताना अजूनही तहानलेले आहेत. असे असताना अंभई मंडळाऐवजी निल्लोड मंडळात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणे सोडून अतिवृष्टी झालेल्या अंभई मंडळातच कृत्रिम पाऊस पाडला जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial Rain In Undongaon