रासायनीक खताची कृत्रीम टंचाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

नांदेड : रासायनीक खत नेमुण दिलेल्या दुकानात किंवा गोदामात न ठेवता त्याची कृत्रीम टंचाई भासवून दुसऱ्याच ठिकाणी ठेवणाऱ्या दुकानचालकांवर माहूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 126 युरिया खताचे पोते जप्त केले आहे. 

नांदेड : रासायनीक खत नेमुण दिलेल्या दुकानात किंवा गोदामात न ठेवता त्याची कृत्रीम टंचाई भासवून दुसऱ्याच ठिकाणी ठेवणाऱ्या दुकानचालकांवर माहूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 126 युरिया खताचे पोते जप्त केले आहे. 

माहूर तालुक्यातील लांजी येथे किशोर हरीसिंग राठोड यांचे मे. अजय फर्टीलायझर कृषी सेवा केंद्र नावाचे दुकान आहे. या दुकानावर एैन पेरणीमध्ये शेतकरी रासायनीक युरीया खतासाठी खेटे मारत असतांना या शेतकऱ्यांना आपल्याकडे खताचा माल नाही म्हणून माघारी फिरवत असत. या प्रकरणी शेतकऱ्यांची तक्रार आल्यानंतर माहूर तालुका कृषी अधिकारी अशोक माधव पिंपळगावकर यांनी आपल्या पथकासह लांजी येथील अजय फर्टीलायझर नावाच्या दुकानावर छापा टाकला. त्यांना देण्यात आलेले युरीया खत व विक्री झालेले खत यामध्ये तफावत येत असल्याने त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली. 

त्यांना दुकानात व गोदामात हे खत सापडले नाही. त्यांनी कसुन चौकशी केली असता दुकानातील 126 युरीयाचे पोते स्वत:च्या फायद्यासाठी काळ्या बाजारत चढ्या भावाने विकण्यासाठी गावशेजारी असलेल्या गायरानातील एका शेडमध्ये लपवून ठेवले होते. खत असतांना ऐन पेरणीत शेतकऱ्यांना खत दिले नाही. या पथकांनी हे सर्व खत जप्त केले. अशोक पिंपळगांवकर यांच्या फिर्यादीवरुन माहूर ठाण्यात वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस हवालदार जाधव हे करीत आहेत. 

Web Title: Artificial scarcity of chemical fertilizers