ग्रामसेवक अशोक धमने लाच घेताना जाळ्यात

प्रल्हाद कांबळे
रविवार, 2 डिसेंबर 2018

ग्रामपंचायतमधून वडिलोपार्जीत प्लॉटचा नमुना नंबर आठ रजीस्टरला नोंद घेऊन उतारा देण्यासाठी ग्रामसेवक अशोक धमने हा 14 हजाराची लाच घेताना रंगेहात जाळ्यात अडकला. ही कारवाई गोगो तांडा (ता. देगलूर) येथे शनिवारी (ता. 01) सायंकाळी केली.

नांदेड: ग्रामपंचायतमधून वडिलोपार्जीत प्लॉटचा नमुना नंबर आठ रजीस्टरला नोंद घेऊन उतारा देण्यासाठी ग्रामसेवक अशोक धमने हा 14 हजाराची लाच घेताना रंगेहात जाळ्यात अडकला. ही कारवाई गोगो तांडा (ता. देगलूर) येथे शनिवारी (ता. 01) सायंकाळी केली.

देगलुर तालुक्यातील गोगो तांडा येथील तक्रारकर्ता यांच्या वडिलांच्या नावे असलेला प्लॉट गट ग्रामपंचायत कार्यालय बेंबरा, गोगोतांडा, माणूर येथे लावायचा होता. यासाठी तक्रारदार हा ग्रामपंचायतमध्ये गेले. या कामासाठी ग्रामसेवक अशोक विठ्ठलराव धमने याने 14 हजाराची लाच मागितली. परंतु ही लाच देण्याची ईच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. यावरून एसीबीने गोगो तांडा येथे शनिवारी सायंकाळी सापळा लावला.

14 हजाराची लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात ग्रामसेवक अलगद अडकला. या प्रकऱणी पोलिस निरीक्षक भूजंग गोडबोले यांच्या फिर्यादीवरुन मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधिक्षक संजय लाटकर, पोलिस उपाअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भुजंग गोडबोले, शेख चांद, हनमंत बोरकर, गणेश तालकोकुलवार, सुरेश पांचाळ आणि निळंकठ येमुनवाड यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Ashok Dhamne is trapped in a bribe case