esakal | वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोक जैन यांचा राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोक जैन

वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष अशोक जैनांचा राजीनामा

sakal_logo
By
प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : संपूर्ण राज्यात शाखा असलेल्या वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे (Vaidyanath Nagari Cooperative Bank) अध्यक्ष अशोक जैन (Ashok Jain) यांनी गुरुवारी (ता.२९) सायंकाळी झालेल्या बोर्ड कमिटीच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा आपण वैयक्तिक कारणांमुळे देत असल्याचे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) नामांकित, अग्रगण्य असलेली व १००० कोटींच्या ठेवी असलेली वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे गेल्या १० वर्षांपासून अध्यक्ष असलेले श्री.जैन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजपचे दिवंगत राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde), अशोक सामत यांच्या ताब्यात असताना बँकेनी आपले नाव सुरुवातीला मराठवाड्यात, तर १३ जुलै २०११ ला अशोक जैन यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर २५० कोटींच्या ठेवीवरुन १००० कोटींच्या ठेवी, मराठवाड्यानंतर (Marathwada) संपूर्ण महाराष्ट्रात बँकेच्या शाखा स्थापन करुन नावारुपाला आणली.(ashok jain resigned from chairman of vaidyanath nagari cooperative bank beed glp88)

हेही वाचा: दारु पिऊन तर्राट झालेल्या तरुणीने घातला बसस्थानकात धिंगाणा

गोपीनाथराव मुंडे यांच्या नंतर या बँकेवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde), खासदार डॉ.प्रितम मुंडे (Pritam Munde) यांचे वर्चव राहिले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नोटाबंदीनंतर अध्यक्ष अशोक जैन यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप होऊ लागले. पण या सर्व आरोपांना अशोक जैन यांनी बँकेच्या प्रगतीतून या आरोपांना उत्तर दिले आहे. पण गुरुवारी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे कारण देत अशोक जैन यांनी राजीनामा दिला. आता या बँकेचे अध्यक्ष म्हणून पंकजा मुंडे कोणाची नेमणूक करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण येत्या काही महिन्यात बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूका तोंडावर आलेल्या आहेत.

loading image
go to top