esakal | पतीचा मृतदेह काढण्यासाठी स्कुबा डायव्हिंग पथकाची मदत द्यावी; पत्नीची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

स्कुबा पथक

पतीचा मृतदेह काढण्यासाठी स्कुबा डायव्हिंग पथकाची मदत द्यावी; पत्नीची मागणी

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथून जाणाऱ्या कालव्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या पतीचा पाय घसरुन पडल्याने मृतदेह मिळाला नाही, त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अकोला येथील स्कुबा डायव्हिंग पथकाला परवानगी द्यावी यासाठी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी यांना गुरुवारी (ता. २७) निवेदन दिले आहे.

याबाबत अनिता सुरेश काळे या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले की, नांदेड जिल्ह्यातील कोळी गावाकडून हिंगोलीकडे परतत असताना मंगळवारी (ता. २५) मे रोजी दुपारी एकच्या सुमारास येहळेगाव तुकाराम नजीक असलेल्या कालव्याजवळ येताच त्यांच्या मुलांना तहान लागली होती. त्यामुळे सुरेश काळे यांनी बॉटल घेऊन पाणी आणण्यासाठी कालव्यावर गेले असता त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करुन दोन दिवसापासून त्यांचा मृतदेह सापडला नाही.

हेही वाचा - भारतीय राज्यघटनेचा संदर्भ आज द्यायचं कारण, म्हणजे गेले काही दिवस सोशल मीडियावर सुरू असलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा गदारोळ.

कालव्यामधील पाणी कमी करा अशी विनंती देखील या महिलेने केली होती. मात्र त्यांचे कोणीही ऐकले नसल्याचा आरोप करुन पतीला काढण्यासाठी अकोला येथील स्कुबा डायविंग पथकाला बोलावण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी गुरुवारी अनिता काळे राहणार गाडीपुरा हिंगोली यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो नातेवाईक उपस्थित होते.

काय आहे स्कुबा डायव्हिंग पथक ?

पाण्यात बुडालेल्यांचा शोध, तलावातील गाळ तपासणे, पाण्यातील जैववैविधतेचा शोध घेण्यासाठी याचा वापर होतो. शिवाय तलावाची खोली व उंची तपासण्यासोबत तलावातील गाळ, पाण्याचे नमुने तपासणे, तळातील पाणवनस्पती तपासण्यासाठीही याचा वापर केला जातो. तसेच आपत्तीच्या वेळी या पथकाच्या जवानांना तैनात करुन खोल पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम केल्या जाते. आॅक्सीजन सिलेंडरसह हे जवान पाण्यात खूप वेळ राहतात. अकोला येथील स्कुबा डायव्हिंग पथक याकामी तरबेज असल्याने त्या पथकाला पाचारण करावी अशी मागणी करण्यात आली आहे.