नांदेडमधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

नांदेडमधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
नांदेडमधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेड येथील दोघांनी रविवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे  एक लाख ४४ हजार ८७७ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

कोरोनामुळे आर्थिक संकटही ओढावले असून त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याचबरोबर कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी उद्योजक, विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी नागरिक पुढे येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहायत्ता निधीला मदत करत आहेत. 

दोघांनी दिला धनादेश 
नांदेडच्या ओमकार कंट्रक्शनचे दादाराव ढगे यांनी 1 लाख 11 हजार रुपये तर रामदास होटकर यांनी आपल्या पेन्शन मधून 33 हजार 877 रुपये देणगीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिला. त्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सुपूर्द केला. यावेळी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, पुरवठा अधिकारी शरद मंडलिक आदींची उपस्थिती होती.


कोणालाही उपाशी ठेऊ नका... - अशोक चव्हाण
दरम्यान, पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड शहर व जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा घेतला. कोरोनाच्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह इतर राज्यातील एकही व्यक्ती, मजूर, हमाल, रोजंदारी कर्मचारी उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
कोरोनाच्या परिस्थितीला मुकाबला करण्यासाठी चालू असलेल्या स्थितीचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतला त्यावेळी त्यांनी सुचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आदी या वेळी उपस्थित होते. 

नियंत्रण कक्ष सतर्क ठेवा
कोणत्याही परिस्थितीत परराज्यातील कामगार व जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, याबाबत महत्वाच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष सतर्क ठेवून संपर्क करणाऱ्यांची तत्काळ दखल घेऊन त्यांना वेळेत मदत करावी. जिल्ह्यात कुठेही रक्तदान करता येईल यासाठी तालुकास्तरावर रक्तदान करता येईल अशा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी चालू असलेल्या मदत केंद्रातील सोयी बाबत महत्वाच्या सूचनाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी दिल्या.  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com