अडकून पडलेल्या मजुरांना तेलंगणा सरकारची मदत

corona.jpg
corona.jpg


कंधार, (जि.नांदेड) ः हातावर हात ठेवून बसल्याने काहीच साध्य होत नाही. प्रयत्नातून मार्ग सापडतो. हे कंधार, लोहा, मुखेड तालुक्यातील मजुरांना तेलंगणा सरकारची मदत मिळाल्यावरून स्पष्ट होते. लॉकडाउनमुळे तेलंगणात अडकून पडलेल्या सातशेच्या वर मजुरांची सोय करावी यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले असून तेलंगणा सरकारने अडकून पडलेल्या मजुरांना रेशन व आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याने ‘त्या’ मजुरांना दिलासा मिळाला आहे.


सद्या देशभर कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारकडून देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे सर्व व्यवहार ठप्प, तर झालेच पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गेलेल्या मजूरदारांना आहे त्या ठिकाणी अडकवून पडावे लागले. काम बंद, व्यवहार बंद आणि वाहतूकही बंद. यामुळे बाहेर गावी गेलेल्या मजुरांसमोर प्रचंड अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. नजिकच्या तेलंगणा राज्यात दरवर्षी कंधार, लोहा आणि मुखेडचे शेकडो मजूर कामासाठी जातात. तेलंगणातील खम्मम, भद्रोदरी, विजयवाडा, वरंगल आदी जिल्ह्यात सद्या मिरचीचा हंगाम सुरू आहे. यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कंधार, लोहा आणि मुखेडचे शेकडो मजूर कामासाठी तेथे गेले होते. कोरोनामुळे अचानक लॉकडाउनची घोषणा झाल्याने हे मजूर तेथेच अडकून पडले.


सातशेच्या वर मजूर तेलंगणात 
राघवपूरम (जि. खम्मम) येथे कंधार तालुक्यातील रामानाईतांडा, कुरुळा, देवळातांडा, ढाकुतांडा, पटाचातांडा येथील (९०), माणिकरम (जि. खम्मम) येथे ढाकूतांडा, हिरामणतांडा, सोनमाळतांडा येथील (५०), बेगमपुडी (जि. भद्रादरी) येथे ढाकूतांडा येथील (८०), ता. इनकोर, जि. खम्मम येथे मुखेड तालुक्यातील बारहळी, जिगरा, तरदाडातांडा येथील (१००) याच बरोबर काजीपेट्ट ता. इनकोर जि. खम्मम येथे (४१), डोरणाकलम ता. मानकौठा जि. वरंगल येथे (२२), दासापल्ली ता. कामापल्ली जि. खम्मम येथे (४२), हिमामनगर ता. इनकोर जि. खम्मम येथे (६०) असे कंधार, लोहा, मुखेड तालुक्यातील सातशेच्या वर मजूर तेलंगणात अडकले आहेत.

महाराष्ट्रात पाठविण्याची व्यवस्था करणार
या मजुरांची आहे त्या ठिकाणी सोय करण्यात यावी यासाठी खासदार चिखलीकर, आमदार शिंदे आणि तालुका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. संबंधित तहसीलदार, सरपंच इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून 'त्या' मजूरदारांना तेथेच रेशन व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. खासदार, आमदार व प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन संबंधित प्रशासनाने कंधार, लोहा व मुखेड तालुक्यातील मजुरांना रेशन व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अडकलेल्या मजूरदारांना तेलंगणा सरकार तीन ते चार दिवसांत महाराष्ट्रात पाठविण्याची व्यवस्था करणार असल्याचे नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com