esakal | खगोलप्रेमींनी अनुभवली गुरू-शनीची युती, दुर्बिणीतून अनेकांनी केले निरीक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna

सूर्यमालेतील दोन मोठे ग्रह असलेले गुरू आणि शनी हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. सोमवारी (ता.21) सायंकाळी खगोलप्रेमींनी या दोन ग्रहांची युती निरीक्षणाचा आनंद लुटला.

खगोलप्रेमींनी अनुभवली गुरू-शनीची युती, दुर्बिणीतून अनेकांनी केले निरीक्षण

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : सूर्यमालेतील दोन मोठे ग्रह असलेले गुरू आणि शनी हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. सोमवारी (ता.21) सायंकाळी खगोलप्रेमींनी या दोन ग्रहांची युती निरीक्षणाचा आनंद लुटला. गेल्या काही दिवसांपासून गुरु व शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ दिसत आहेत. सोमवारी सायंकाळी युती पाहण्याची दुर्मीळ संधी खगोलप्रेमींना मिळाली.

येथील जेईएस महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या ॲस्ट्रॉनॉमी लॅबमधील १२ इंची दुर्बिणीच्या माध्यमातून शनी-गुरूची युतीचे खगोलप्रेमींनी निरीक्षण केले. दीर्घ प्रतीक्षेनंतर गुरू आणि शनी युती स्वरूपामध्ये दिसले आहेत. यावेळी जेईएस संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, श्रीनिवास भक्कड, फुलचंद भक्कड, डॉ. जवाहर काबरा, डॉ. एस बी बजाज, प्रा. कोकणे, प्रा. श्रीनिवास सैंदर, प्रा. सरकटे यांच्यासह खगोलप्रेमींची उपस्थिती होती.

Jalna

Edited - Ganesh Pitekar

loading image