नभ मेघांनी अखेर आक्रमिले...! नांदेड शहरात पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

- शहरवासीयांना हुलकावणी देणारा पाऊस अखेर आज दुपारी नांदेड शहरातही अवतरला.

- काल (ता. १०) सायंकाळी व आज दुपारी एक ते दीडच्या सुमारास पडत असलेल्या पावसाने शेतकरी व सामान्य जणांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

नांदेड : शहरवासीयांना हुलकावणी देणारा पाऊस अखेर आज दुपारी नांदेड शहरातही अवतरला. काल (ता. 10) सायंकाळी व आज दुपारी एक ते दीडच्या सुमारास पडत असलेल्या पावसाने शेतकरी व सामान्य जणांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

जवळपास आठशे ते बाराशे मिमी. इतकी वार्षिक सरासरी असलेल्या या जिल्ह्य़ात यंदा खूपच कमी पाऊस झाला आहे. सर्वदूर पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. अवघा जून महिना एखादा अपवाद वगळता पावसाने निरंक गेल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

यंदा पहिल्यांदाच शहरात सुध्दा टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. इसापूर, सिध्देश्वर मधून पाणी नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी सोडावे लागले. अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने चिंतेची परिस्थिती आहे. मात्र उशिरा का होईना पाऊस सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atlast rain showed up at Nanded