कुठे साडेचार, तर  कुठे दोन हजार! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

औरंगाबाद - एक जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा अडीच हजारांवरून साडेचार हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेने मावळत्या वर्षाला केली. मात्र, शहरातील बहुतांश एटीएममधून साडेचारऐवजी केवळ दोन हजार रुपये मिळाल्याने खातेधारकांना रविवारी (ता. एक) निराश व्हावे लागले. 

नोटाबंदीच्या 50 दिवसात एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा अडीच हजार रुपये होती. मात्र, एटीएममध्ये पैशांचा ठणठणाट आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या तुटवड्यामुळे खातेधारकांच्या हाती केवळ दोन हजार रुपयांची नोटच लागली. रिझर्व्ह बॅंकेने एक जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा दोन हजार रुपयांनी वाढविली. तरीसुद्धा एटीएममधून पुन्हा केवळ दोन हजार रुपये मिळाल्याने खातेधारकांच्या हाती निराशा आली. काही एटीएममधून पाचशे रुपयांच्या नोटा मिळाल्या. दुसरीकडे कॅश डिपॉझिट मशीनचे अपडेट करण्यात येत असल्याने त्यासुद्धा शनिवारी आणि रविवारी बंद होत्या. रविवारी सातशेपैकी चारशे एटीएम सुरू होते. त्यापैकी दीडशेच्या आसपास एटीएम सायंकाळपर्यंत आऊट ऑफ कॅश झाले होते. सोमवारपासून एटीएममधून साडेचार हजार रुपये काढता येतील, अशी माहिती स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: ATM cash available