Dharashiv News : शंभर दिवसांत तीनवेळा ‘एटीएम’वर डल्ला ; बलसूरच्या दुहेरी घटनेनंतर चोरट्यांचे उमरगा शहरात धाडस

तालुक्यातील बलसूर येथील एटीएम दुसऱ्यांदा फोडल्याच्या घटनेनंतर चार दिवसाने उमरगा शहरातील मुख्य मार्गावरील श्रीराम मंगल कार्यालयाच्या बाजुचे "आयसीआयसीआय" बँकेचे एटीएम चोरट्याने गॅस कटरने फोडल्याची घटना रविवारी (ता. चार) पहाटे घडली, त्यात रक्कम नसल्याची माहिती सांगण्यात आली.
dharashiv
dharashivsakal

उमरगा : तालुक्यातील बलसूर येथील एटीएम दुसऱ्यांदा फोडल्याच्या घटनेनंतर चार दिवसाने उमरगा शहरातील मुख्य मार्गावरील श्रीराम मंगल कार्यालयाच्या बाजुचे "आयसीआयसीआय" बँकेचे एटीएम चोरट्याने गॅस कटरने फोडल्याची घटना रविवारी (ता. चार) पहाटे घडली, त्यात रक्कम नसल्याची माहिती सांगण्यात आली. शंभर दिवसात तीन वेळा एटीएमवर दरोड्याच्या घटनेमुळे एटीएमची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या सर्व प्रकाराकडे पोलिस तसेच बँकेचे प्रशासन कधी लक्ष देणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

शहरातील श्रीराम मंगल कार्यालयाच्या बँक ऑफ इंडियाच्या एका दुकानात दोन एटीएम मशिन आहेत. तर त्याला लागुन असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या दुसऱ्या एटीएमची रविवारी पहाटे चारच्या सुमारास चोरट्याने गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडले. शेजारील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला काहीही झाले नाही हे विशेष. तालुक्यातील बलसूर गावात २५ ऑक्टोबर २०२३ च्या मध्यरात्री एटीएमवर दरोडा टाकत चोरट्याने २६ लाखांची रक्कम चोरून नेली होती. परत याच एटीएमवर ३० जानेवारी २०२४ आठ लाख रुपये लंपास केले होते.

ही घटना चार दिवसापूर्वीच असताना चोरट्यांनी आयसीआयसीआय एटीएमवर डल्ला मारला. दरम्यान रविवारी पहाटे तीन वाजून ५० मिनिटांच्या सुमारास पोलिसांची या एटीएमजवळ गस्त होती. मात्र चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास चोरट्यांनी धाडस केले. उमरगा पोलिसांचे तीन पथक व धाराशिवच्या गुन्हे अन्वेषन शाखेच्या दोन पथकामार्फत चोरट्यांचा शोध घेणे सुरू आहे.

dharashiv
ATM Theft : चोरट्यांनी एटीएम मशिन फोडून २६ लाख ८८ हजाराची रक्कम पळविली

उपविभागीय पोलिस अधिकारी गोविंद शेलार, पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक, ठसा तज्ञ पथकाच्या हाती काहीही पुरावे मिळणार नाहीत, याची दक्षता चोरट्यांनी घेतलेले आढळले.

सुरक्षारक्षक नसल्याने चोरट्यांनी केले धाडस

शहरासह ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत, सहकारी बँकासह खासगी बँकाचे एटीएमची संख्या मोठी आहे. मात्र त्यांच्या सुरक्षिततेसाठी मोजक्याच एटीएमसाठी सुरक्षारक्षक आहेत. शिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे अँगल मर्यादित क्षेत्रापुरताच आहे. दरम्यान बलसूरच्या घटनेनंतर पोलिस निरीक्षक पारेकर यांनी शनिवारी (ता. ३) सर्व बँकेच्या व्यवस्थापकांच्या बैठकीत एटीएमच्या सुरक्षिततेविषयी सुचना केल्या होत्या. एटीएममध्ये रोख टाकण्यासाठी आणि तांत्रिक दुरूस्तीसाठी स्वतंत्र एजन्सी आहेत. प्रत्येक एटीएमसाठी विमा सुरक्षा कवच आहे.

भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सुचनांत आर्थिकदृष्टया परवडणारे नसल्याने सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीविषयी फारसी स्पष्टता नाही. त्यामुळे एटीएम फोडण्याच्या प्रकाराला जणू संधीच मिळत आहे. पण कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणेची तत्परता एटीएमच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com