
बीड - मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयावर गोंधळ आणि दलित वॉचमनला मारहाण प्रकरणात अखेर अनेक आरोपानंतर केज पोलिसांनी आरोपींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद केला आहे. ता. सहा डिसेंबरला ही घटना घडली होती. उशिरा केज पोलिसांनी वॉचमन श्री. सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद केला.