गेवराई तालुक्‍यातील विवाहितेवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

गेवराई - घरासमोरील अंगणात झोपलेल्या 29 वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना गेवराई तालुक्‍यातील राजापूर येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गेवराई तालुक्‍यातील विवाहित महिला आई-वडिलांकडे राहते. तिचे आई-वडील 8 मे रोजी यात्रेसाठी बाहेर गेले होते. दरम्यान, उकाड्यामुळे रात्री ही महिला घरासमोरील अंगणात एकटीच झोपली होती. शाम डिगंबर चव्हाण (रा. तारडगाव, ता. घनसावंगी, जि. जालना) याने तिच्यावर अत्याचार केला तसेच, याबाबत कोणाला काही सांगितले तर स्वतः विषारी औषध पिऊन आत्महत्या करीन व याला जबाबदार तू राहशील, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Atrocity on women crime