अभिनेता, दिग्दर्शकावर बीडमध्ये जीवघेणा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

काय झाले, ते कारण कळालेच नाही, पण चित्रपट गृहाच्या आवारातच काही तरुणांनी घोळक्याने येत या तिघांवर हल्ला चढवला. या जीवघेण्या मारहाण व हल्ल्यामध्ये अभिनेते सुरेश ठाणगे, निर्माते धनंजय यमपुरे गंभीर जखमी झाले.

बीड : मराठी सिनेमाचा अभिनेता व दिग्दर्शकावर तरुणांनी अचानक हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी (ता. २२) सायंकाळी घडली. सुरेश ठाणगे व दिग्दर्शक धनंजय यमपुरे हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्री श्वेता कुलकर्णी हिने पळ काढल्याने ती वाचली. दरम्यान, हे सर्वजण बीड जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत. 

येथील आशा सिनेप्लेक्स या चित्रपटगृहात ‘बायको देता का बायको!’ सिनेमाचा प्रीमियर शो होता. जिल्ह्यातीलच कलावंतांनी तयार केलेला सिनेमा असल्याने ते प्रेक्षकांसमवेत हजर होते. चित्रपटगृहाच्या आवारात तरुणांच्या घोळक्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. सिनेमागृहाच्या आवारात फर्निचरची तोडफोडही करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बीड शहरातील आशा सिनेफ्लेक्स या थिएटरमध्ये शनिवारी (ता. २२) 'बायको देता का बायको!' सिनेमाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता. सिनेमाचे अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शक या शोदरम्यान प्रेक्षकांमध्ये मिसळून धम्माल मस्ती करण्यासाठी आले होते.

काय झाले, ते कारण कळालेच नाही, पण चित्रपट गृहाच्या आवारातच काही तरुणांनी घोळक्याने येत या तिघांवर हल्ला चढवला. या जीवघेण्या मारहाण व हल्ल्यामध्ये अभिनेते सुरेश ठाणगे, निर्माते धनंजय यमपुरे गंभीर जखमी झाले. यावेळी तिथेच उपस्थित असलेल्या अभिनेत्री श्वेता कुलकर्णीने बचावासाठी तिथून पळ काढला आणि ती थोडक्यात वाचली. हल्लेखोरांनी चित्रपटगृहात फर्निचरची तोडफोडही केली. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack On Actor Actress And Film Producer Beed News