उस्मानाबादेत पोलीस पथकावर हल्ला; नगरसेवक खलिफा कुरेशींसह इतरांवर गुन्हा

अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर तेथील गावगुंडांचा जबरी हल्ला
Attack On Police Squad In Osmanabad
Attack On Police Squad In Osmanabadesaka

उस्मानाबाद : अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर तेथील गावगुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली असुन नगरसेवक खलिफा कुरेशीसह त्यांचा भाऊ कलीम कुरेशी अन्य चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी लोकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन नगरसेवक खलिफा कुरेशीसह त्यांचा भाऊ कलिम दोघेही फरार असल्याची माहिती आहे. सहायक पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांनी फिर्याद दिलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काही तक्रारदारांनी येऊन खिरणीमळा भागामध्ये अवैध पद्धतीने कत्तलखाने सूरु असल्याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांची परवानगी घेऊन पथक पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. (Attack On Police Squad In Osmanabad, Cases Filed Against Kalifa Kureshi And Other)

Attack On Police Squad In Osmanabad
एमआयएमशी यूती नाही,असे म्हणत प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसबरोबर जाण्याचे संकेत

तिथे जाऊन छापा मारला तेव्हा एका पत्र्याच्या शेडमध्ये बारा ते चौदा लहान मोठी जनावरे कापलेली दिसुन आले. मांस अस्ताव्यस्त पडल्याचे पोलीसांनी दिसले. तिथे असलेल्या चार लोकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळुन गेले व लांब जाऊन पोलीसांच्या पथकावर हल्ला चढविला. त्याचवेळी आणखी दोन लोक आले व त्यांनीही दगडफेक करण्यास सूरुवात केली. ज्यांनी तक्रार दिलेली होती त्यांना मारहाण करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांनी जनावरे कापण्यासाठी वापरण्यात येणारे हत्याराने वार केल्याने त्यात काहीजण गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार समाधान नवले यांच्या उजव्या डोळ्यास गंभीर मारहाण झालेली असून बबन जाधवर यांच्याही डोक्याला जखम झाली आहे. सुरुवातीला दगडफेक करणाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. (Osmanabad)

Attack On Police Squad In Osmanabad
लता दीदींनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले अन् देवीसमोर गायले कवन

त्यामध्ये हुसेन पापा शेख, फैसल कौसर पठाण, सागर कबीर गायकवाड व आनंद जीवन पेठे यांचा समावेश होता. या चार जणांकडे पोलीसांनी चौकशी केली असता हा कत्तलखाना नगरसेवक खलिफा कुरेशी यांचा असल्याचे सांगितले. विनापरवाना असुन घटनास्थळावरुन पोलीसांनी मारहाण करण्यासाठी वापरलेले सतुर, चाकु ताब्यात घेतले. तिथे असलेले आयशर टेम्पो व त्यामध्ये भरले दोन हजार 820 किलो मांस भरले. त्याची किंमत तीन लाख 38 हजार एवढी होते. हा टेम्पो मांसासहीत शहर पोलीस ठाण्यात उभा करण्यात आला आहे. सहा जणासहीत अनोळखी व्यक्तींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com