दुकान बंद केल्याने बीड जिल्ह्यात पोलिसावर हल्ला, ११ जण अटकेत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

नाकलगाव येथे संचाबंदीच्या काळात मटणाचे दुकान सुरू असल्याने पोलिस कर्मचारी विशाल मुजमुले, आकाश जाधव यांनी दुकानचालक शेख मुस्तफा उर्फ राजू यास जाब विचारून दुकान बंद केले. याचा राग मनात धरून काही वेळानंतर वीस, पंचवीस जणांच्या समुदायाने गावाशेजारी असलेल्या एका शेतात जाऊन पोलिसांना मारहाण केली.

माजलगाव (जि. बीड) - संचारबंदीच्या काळात मटणाचे दुकान उघडे का ठेवले, याचा जाब विचारणाऱ्या दोन पोलिसांवर एका समूहाने हल्ला करत मारहाण केली. या प्रकरणात दिंद्रुड पोलिस ठाण्यात १९ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. आठ) रात्री दहाच्या सुमारास नाकलगाव शिवारात घडली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असून जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. नाकलगाव येथे संचाबंदीच्या काळात मटणाचे दुकान सुरू असल्याने पोलिस कर्मचारी विशाल मुजमुले, आकाश जाधव यांनी दुकानचालक शेख मुस्तफा उर्फ राजू यास जाब विचारून दुकान बंद केले. याचा राग मनात धरून काही वेळानंतर वीस, पंचवीस जणांच्या समुदायाने गावाशेजारी असलेल्या एका शेतात जाऊन पोलिसांना मारहाण करायला सुरवात केली.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

आरडओरडा झाल्याने गावातील काही ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन सोडवासोडवी केली. यात दोन्ही पोलीस गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याबाबत दिंद्रुड पोलिस ठाण्यात १९ आरोपींविरुद्ध जीवेमारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणल्यासह विविध कालामानुरासार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

पोलिसांनी यातील शेख पाशा शेख रहिम, शेख मुस्ताफा उर्फ राजु शेख जमाल, शेख जमाल शेख हसन, शेख सिध्दिकी शेख रशिद, शेख अब्दुल शेख इब्राहिम, शेख नसीर शेख जमाल, शेख रशीद शेख हसन, शेख रहिम शेख हसन, राजाभाऊ अण्णासाहेब गुजर, हनुमान राजेसाहेब ढोले, सुरेश आर्जुन काठुळे या नऊ जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत ढिसले यांनी शनिवारी (ता. नऊ) दिंद्रुड पोलिस ठाण्याला भेट दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on police in Beed district, 11 arrested