संचारबंदीत पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना मारहाण

दिगंबर देशमुख
Thursday, 26 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोटारसायकलवर पेट्रोलिंग करणाऱ्या दोघा पोलिसांना दहा-बारा जणांच्या गटाने मारहाण केल्याची घटना सिरसाळा गावातील पवार गल्लीत बुधवारी ( ता.25)साडे चार दरम्यान घडली. सर्व दहाजणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

सिरसाळा (बीड) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोटारसायकलवर पेट्रोलिंग करणाऱ्या दोघा पोलिसांना दहा-बारा जणांच्या गटाने मारहाण केल्याची घटना सिरसाळा गावातील पवार गल्लीत बुधवारी ( ता.25)साडे चार दरम्यान घडली. सर्व दहाजणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

किशोर कचरू घटमल व संतोष जेटेवाड अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. हे पोलीस आज चार दरम्यान पवार गल्लीतून जात असताना तुम्ही रस्त्यावर का थांबत आहात, घरात बसा, असे सांगत असताना आमच्या गल्लीत का आलात, असा प्रश्न पोलिसांना केला.

यानंतर राम तुकाराम पवार, अशोक तुकाराम पवार, श्रीराम बाबू पवार, दत्ता हरीचंद्र देवकर, विकास अर्जुन मिटकर, विलास अर्जुन मिटकर, सोनाली राम पवार, राम तुकाराम पवार, अनिल जाधव, आणि आणखी दोघा अज्ञातांनी पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी, लाकूड फेकून मारहाण करण्यात आली. 

या सर्वांवर कलम 353 नुसार गुन्हा नोंद झाल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. या घटनेतील पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पीएसआय श्री. पुरी करीत आहेत.

खैरे म्हणतात, मी मरेपर्यंत....

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack On Police In Sirsala Beed Coronavirus LockDown News