अल्पवयीन बहीण-भावाला लातूरमध्ये विकण्याचा प्रयत्न

अल्पवयीन बहीण-भावाला लातूरमध्ये विकण्याचा प्रयत्न

बीड - एका महिलेने अल्पवयीन बहीण-भाऊ दोघांना प्रत्येकी एक लाखात विक्री करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या दोघांनी वेळीच पलायन केल्याने पुढील अनर्थ टळल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत माहिती अशी - आंध्र प्रदेशातील कडाप्पा येथील एक महिलेला चार मुले आहेत. तिच्या ओळखीच्या एका महिलेने नंदिनी (वय नऊ) व आकाश (वय ११, दोघांची नावे बदलली आहेत) यांना वसतिगृहात टाकण्याचा बनाव करून त्यांना लातूरमध्ये प्रत्येकी एक एक लाखात विकण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित महिलेने त्यांना चटके दिले. यानंतर दोघांनी रात्री पळ काढला व ते लातूरहून रेल्वेने परळीत पोचले. यानंतर परळी रेल्वे पोलिसांना ही घटना त्या दोघांनी सांगितली. त्यानंतर पोलिसांनी बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांना याबाबत माहिती दिली. तत्त्वशील कांबळे यांनी दोघांनाही बीडला आणले व त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. हा प्रकार संशयास्पद असल्याने आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचे बालहक्क कार्यकर्ता तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले. या दोन्ही मुलांना गेवराई तालुक्‍यातील सहारा अनाथालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com