esakal | तात्काळ मदतीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

तात्काळ मदतीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंठा (जि. जालना) : मंठा तालुक्यात अतिवृष्टीने सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असुन शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तात्काळ देण्यात यावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.१) तालुक्यातील काही गावांच्या सरपंच व शेतकऱ्यानी धरणे आंदोलन करून शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. दरम्यान चार तसापासून शेतकरी आंदोलनासाठी बसले होते. परंतु तहसीलचा कोणताच अधिकारी किंवा कर्मचारी आंदोलकांची दखल घेत नसल्याने आंदोलकांनी उग्र रूप धारण केले. यावेळी उपसभापती राजेश मोरे सह चार ते पाच शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतुन घेवुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

आंदोलन उग्र होत असल्याची माहिती आमदार बबनराव लोणीकर यांना कळाली. त्यांनी आंदोलन शांततेत करण्याचा सल्ला दिला. तसेच मंठा पोलिसानी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

यावेळी नायब तहसीलदार संजय शिंदे, पेशकार प्रल्हाद दवणे व पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांचे निवेदन घेवुन आंदोलन सोडण्यात आले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतीसह पिकाचे, विहिरीचे, जनावरांचे नुकसान झाले. किर्तापुर येथिल रुस्तुम मस्के हा शेतकरी पुराच्या पाण्यात वाहुन जावून मरण पावला. हेलस येथिल एका शेतकऱ्यावर शेतात असताना विज पडून त्याचा मृत्यू झाला.

काही शेतकऱ्यांची जनावरे दगावली. या शिवाय तालुक्यातील पाझर तलाव फुटुन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. रस्त्यावरील पुल वाहुन गेले. तरी देखील आघाडी सरकारचे डोळे उघडत नाहीत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत मौन सुटत नाही या प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.यावेळी आघाडी सरकारचा निषेध करत राज्य सरकारच्या विरोधात घोषणबाजी करण्यात आली.

हेही वाचा: बँकेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

दिलेल्या निवेदनावर निवेदनावर राजेश मोरे यांच्या सह शेषनारायण दवणे, परसराम चव्हाण, भाऊसाहेब देशमुख, सुरेश देशमुख, कैलास देशमुख, भगवान देशमुख, विजय राठोड, माणिक देशमुख, सुंदर देशमुख, सुधाकर चव्हाण, विश्वनाथ राठोड, उत्तम राठोड, प्रल्हाद देशमुख, विलास देशमुख, ज्ञानेश्वर चव्हाण, महादेव देशमुख, प्रकाश देशमुख, सिद्धेश्वर देशमुख, भारत राठोड, सुधाकर जाधव, उद्धव जाधव, विष्णू जाधव, दादाभाऊ ढवळे, ज्ञानेश्वर जाधव, सुरेश जाधव, मारूती काकडे, आदिनाथ काकडे, सुधाकर जाधव, संजय मोरे, ज्ञानेश्वर मोरे, कल्याण मोरे, संतोष मोरे, सोपान वाघमारे, संतोष सोनवणे, विठ्ठलराव खवणे, मुरलीधर मोरे यांच्यासह दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

दरम्यान तहसिलदार सुमन मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्या सोमवारपर्यंत रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top