औरंगाबाद खंडपीठाने केला त्या 'जोडी' च्या लग्नाचा मार्ग मोकळा 

Aurangabad bench helps for marriage of a couple
Aurangabad bench helps for marriage of a couple

औरंगाबाद - प्रेमविवाह करणारे मुलगा अन् मुलगी दोघे सज्ञान असल्याने मुलीने कुणासोबत राहायचे हा सर्वस्वी तिचा अधिकार असल्याचे मतप्रदर्शन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे व न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी केले. अंबाजोगाई येथील सव्वीस वर्षे वयाच्या मुलाने आपल्याच वयाच्या मुलीस पत्नी म्हणून स्वीकारण्याचे अभिवचन खंडपीठात दिल्याने खंडपीठाने मुलीस मुलासोबत जाण्याची मुभा दिली. खंडपीठाच्या निर्मयामुळे दोघांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

अंबाजोगाई (जि. बीड) येथील शेअर व्यवसायातील सव्वीस वर्षीय मुलगा आणि हिंगोलीतील त्याच वयाच्या मुलीची मागील पंधरा वर्षांपासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर त्यांनी लग्नगाठ बांधून नात्यात परावर्तीत करण्याचे ठरविले. 

...अन्‌ तिची घरच्याविरोधात तक्रार -
दोघांनीही हिंदू विवाह पद्धतीप्रमाणे लग्न करण्यासाठी बीड येथे नोंदणी केली. यानंतर मुलगी घरी परतल्यावर तिच्या घरच्यांना मुलीच्या नोंदणी पद्धतीने विवाह करण्याच्या प्रकरणाची माहिती मिळाली. मुलीचे तिच्या आई वडिलांसोबत वाद झाले. घरचा दबाब वाढल्यानंतर मुलीवर अनेक बंधने लादण्यात आली. आपल्या पसंदीचा जोडीदार निवडण्यास घरचे विरोध करीत असल्याने मुलीने सरळ पोलिस ठाणे गाठून घरच्यांविरोधात तक्रार दिली. मुलीच्या संमतीने पोलिसांनी तिला नांदेड येथील महिला वसतीगृहात ठेवले.

मुलाची खंडपीठात धाव -
दोघांच्या लग्नासंबंधीच्या नोटीसचा कालावधी संपत चालल्याने आणि मुलीस भेटण्यास मज्जाव केला जात असल्याने मुलाने अॅड. राहूल धसे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. लग्नाची तारीख जवळ येत असून आम्ही स्वखुशीने विवाह करीत आहोत. मुलगी सज्ञान असून तिच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही. त्यामुळे लग्नासाठी मुलीस पोलिस संरक्षणात बीड येथील विवाह नोंदणी कार्यालयात हजर करण्यात यावे असी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली. 

खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय -
दरम्यान मुलीच्या आई वडिलांनी खंडपीठात हस्तक्षेप अर्ज सादर केला. प्रथम खंडपीठाने याचिकेत नोटीस बाजवल्या. 1 ऑक्‍टोबर रोजी मुलीला खंडपीठात हजर करण्यात आले. खंडपीठाने मुलीसोबत चर्चा केली. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकल्यानंतर मुलगी व मुलगा दोघांचे वय 26 असल्याने दोघे आपल्या भविष्याचा निर्णय घेण्यास सक्षम आहेत. मुलीला कुठे आणि कुणासोबत राहायचे आहे हे समजण्याएतकी ती सज्ञान आहे असे मतप्रदर्शन खंडपीठाने केले. तिच्या भवितव्यासंबंधीचा निर्णय घेणे हा सर्वस्वी तिचा अधिकार आहे. असे सांगून खंडपीठाने याचिका निकाली काढली. मुलाने खंडपीठात शपथपत्राद्वारे आपण तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास तयार आहोत असे अभिवचन दिले. खंडपीठाच्या निकालानंतर मुलगी मुलासोबत गेली. मुलाच्या वतीने अॅड. राहूल धसे तर शासनाच्या वतीने ऍड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com