फ्लिपकार्ट- वॉलमार्ट कराराविरोधात औरंगाबाद 'बंद'

फ्लिपकार्ट- वॉलमार्ट कराराविरोधात औरंगाबाद 'बंद'

औरंगाबाद : रिटेल क्षेत्रात फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांच्यात झालेल्या कराविरोधात देशभरात शुक्रवारी (ता.28) बंद पाळण्यात आला. या 'बंद'मध्ये औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला .शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा कडकडीत बंद होत्या यामुळे कोट्यवधीची उलाढाल ठप्प होती.

शहरात जिल्हा व्यापारी महासंघातर्फे सकाळी साडेनऊ वाजता शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बंदला प्रारंभ झाला त्यानंतर जिल्हाधिकारी महासंघ व पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागाचा दौरा केला या बंदमध्ये किराणा, पुस्तक विक्रेते, हॉटेल कापड विक्रेते तेल विक्रेते या सर्व व्यवहार आणि बाजारपेठा बंद होत.

यामध्ये जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, अजय शहा, लक्ष्मीनारायण राठी, या संघटनेशी संलग्न असलेल्या इतर सर्व संघटनांनी यात सहभाग घेत शंभर टक्के बंद पळला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत, जुना मोंढा निराला बाजार गुलमंडी शाहगंज ही अडत व्यापाऱ्यांनी शंभर टक्के बंद पाळण्यात मात्र सकाळी भाजीपालाची सकाळी 8 वाजेपर्यंत व्यवहार सुरू होते त्यानंतर मात्र बंद पाळण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com