औरंगाबाद शहर होणार डिजिटल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - उशिराने का होईना स्मार्ट सिटी योजनेतील एक-एका कामाच्या निविदा प्रसिद्ध होत आहेत. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ११८ कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढली आहे. मास्टर  सिस्टिम इंटिग्रेशनअंतर्गत शहरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, कमांड सेंटर, डिजिटल डिसप्ले लावणे, इंटरनेट, वायफाय, स्मार्ट बस थांबे, घनकचरा व्यवस्थापन अशा कामांचा यात समावेश असून, निविदा अंतिम झाल्यानंतर सहा महिन्यांत ही कामे केली जाणार आहेत. 

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची निवड होऊन दोन वर्षे उलटली आहेत; मात्र अद्याप कामांना गती मिळाली नव्हती. महापालिका मुख्यालयासाठी सौरऊर्जा प्रकल्प व शहर बस खरेदीची निविदा वगळता इतर कामे प्रलंबित होती; मात्र शुक्रवारी (ता. तीन) शहर सुरक्षा, वाहतूक नियमन आणि कम्युनिकेशन नेटवर्कमधील सुधारणांसाठी ११८ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. सिटी कम्युनिकेशन नेटवर्क उभारणे, पोलिसांसाठी कमांड ॲण्ड कंट्रोल रूम उभारणे, महापालिकेसाठी कमांड ॲण्ड कंट्रोल रूम उभारणे, सातशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, स्मार्ट ट्रान्स्पोर्ट सिस्टिम आणि स्मार्ट बस स्टॉप उभारणे, शहर वाय फाय करणे, डिजिटल डिसप्ले लावणे, घनकचरा व्यवस्थापनाच्या गाड्यांना जीपीएस बसविणे, औरंगाबाद सिटिझन्स मोबाईल ॲप्लिकेशन आणि पोर्टल तयार करणे आदी कामांचा यात समावेश असून, निविदा दाखल करण्यासाठी सहा सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे.

अशी आहेत कामे  
-सातशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. त्याचे नियंत्रण कक्ष पोलिस आयुक्‍तालय व महापालिकेत असेल. 
-सिटी बसस्थानकामध्ये बसचे मार्ग, वेळा याची माहिती देणारे डिजिटल बोर्ड असतील. इमर्जन्सी कॉल सेंटर, सोलार पॅनेल असतील. 
-मोफत इंटरनेट सुविधा देण्यासाठी सातशे वायफाय स्पॉट असतील. 
-नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी सिटिझन्स ॲप तयार करण्यात येणार आहे. एक वेब पोर्टलही सुरू केले जाईल. 

Web Title: Aurangabad city will be digital