esakal | Aurangabad: लेणीजवळ मित्राला बोलावून चाकूने वार
sakal

बोलून बातमी शोधा

crime

औरंगाबाद : लेणीजवळ मित्राला बोलावून चाकूने वार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मित्राने फोन करुन विद्यापीठातील लेणीजवळ भेटायला बोलावले, अन् त्याच्याशी भांडण करत चक्क चाकूने वार केले. हा गंभीर प्रकार २ ऑक्टोंबरच्या पहाटे दीड ते पावणे दोनच्या सुमारास विद्यापीठातील लेणीजवळ घडला.

मयूर भास्कर आडोळे ऊर्फ नन्या (रा. श्रीकृष्ण मंदीराजवळ, बेगमपूरा) असे त्या चाकूने वार करणाऱ्या आरोपी मित्राचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी सम्राट सुरेश वानखेडे (२४, रा. नंदनवन कॉलनी) आणि मयूर ऊर्फ नन्या हे एकमेकांचे मित्र आहेत. २ ऑक्टोंबर रोजी नन्याने सम्राटला फोन केला आणि विद्यापीठातील लेणीजवळ भेटण्यासाठी बोलविले. दरम्यान सम्राट हा मित्रासोबत गेला असता, नन्या याने तू माझ्याबद्दल पोरांना काय सांगत असतो?’ असे म्हणत सम्राटला हाताचापटाने मारहाण करण्यास सुरु केली.

हेही वाचा: औरंगाबाद : न्याय मागण्यांसाठी ‘मार्ड’च्या डॉक्टरांचा घाटीत कॅंडल मार्च

दरम्यान, सम्राट हा समजावून सांगत असतानाच नन्याने कंबरेमध्ये लावलेला धारदार चाकू काढून सम्राटच्या डाव्या बरगडीमध्ये खुपसला. यात सम्राट गंभीर जखमी होत कोसळला. सम्राटच्या इतर मित्रांनी त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालय (घाटी) येथे उपचारासाठी दाखल केले. सम्राट हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी उपनिरीक्षक ज्योती गात यांनी गुन्हा दाखल केला. नन्या याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने मयूर ऊर्फ नन्याला बुधवारपर्यंत (ता.६) पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. शेख करत आहेत.

loading image
go to top