esakal | औरंगाबाद : मुलाला नोकरीला लावून देतो म्हणून दहा लाखांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

crime

औरंगाबाद : मुलाला नोकरीला लावून देतो म्हणून दहा लाखांची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : आमच्या अनेक महाविद्यालयात ओळखी आहेत, तुमच्या मुलीला नोकरीला लावून देतो, असे सांगून दहा लाखाची मागणी करत जालन्यातील सासरच्या मंडळीवर हुंडाबळी व फसवणुकीचा गुन्हा जिन्सी पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पती रोहित जगन्नाथ पोतराजे (वय २९ रा. साईबाबा मंदिर संग्राम नगर, जालना) सासु सुमित्रा जगन्नाथ पोतराजे (वय ४८) चुलत सासू चंद्रकला छगन पोतराज (वय ५०) दीर राहुल जगन्नाथ पोतराजे (वय ३१) अशा आरोपींची नावे आहेत. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, एका वधूवर परिचय मंडळामार्फत मार्च २०२१ मध्ये ओळख करून दोघांचे लग्न लावण्याचा निर्णय झाला. यात ५ मेरोजी लग्नाची बोलणी करण्यासाठी मुलाकडची मंडळी फिर्यादीच्या घरी आले असता त्यांनी मुलीला नोकरी लावून द्यावे लागेल असे सांगितले. यावरून महिलेच्या घरच्याकडून नोकरी लावणे अवघड आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा रास्ता रोको, आंदोलक ताब्यात

यावर मुलाकडच्या मंडळींनी आम्हाला दहा लाख रुपये द्या, आम्ही मुलीला कॉलेजमधून नोकरी लावून देतो असे सांगितले. यावर मुलीकडच्या मंडळींनी पैशांची जुळवाजुळव करीत २० एप्रिल २०२१ला एक लाख रुपये दिले तर पुढील एका महिन्यात ५० हजार रुपये असे दीड लाख रुपये दिले. त्यानंतर रोहित पोतराजसोबत त्या मुलीचे ५ मेरोजी लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर काही दिवस फिर्यादी महिलेला सासरच्या मंडळीनी चांगले वागवले.

त्यानंतर एका महिन्यातच तिला उर्वरित रक्कम वडिलांकडून मागवण्यासाठी त्रास सुरू झाला. त्यानंतरच महिलेच्या घरच्या मंडळींकडून ८५ हजार रुपये रोख रक्कम आणून दिली. नंतर तिला बनावट ऑर्डर दिली. मुलीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांनी रोहितने तुमची मुलगी आम्हाला आवडत नाही, ती शरीराने बारीक आहे, असे सांगून तिला माहेरी पाठवले. शेवटी मुलीच्या तक्रारीनुसार जिन्सी पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींची विरोधात हुंडाबळी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

loading image
go to top