औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

मधुकर कांबळे
Monday, 25 November 2019

 •  रात्रीच्या वेळी करणार मदत
 • जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेचा उपक्रम 
 • त्या-त्या भागात रुग्णांच्या मोफत रिक्षा सेवेत तत्पर 

औरंगाबाद-  रात्रीची वेळ.... घरात आजारी माणूस... अचानक रुग्णालयात न्यायची वेळ आली; मात्र वाहन मिळत नाही. रस्त्यावर दूरवर ऑटोरिक्षाही दिसत नाही. मग काय करणार, अशी वेळ कुणावरही येऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाली तर तत्काळ मदत देण्यासाठी जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. रात्री 10 ते पहाटे 5 या वेळात या संस्थेमार्फत शहरात 36 रिक्षाचालकांच्या मदतीने रुग्णांसाठी ऑटोरिक्षा उपलब्ध करून दिली जातेय आणि तीही मोफत. 

संस्थेचे अध्यक्ष संजय हळनोर यांनी सांगितले की, जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेमार्फत औरंगाबाद शहरातील गरजू रुग्णांना दवाखान्यात नेण्यास मदत केली जात आहे. शहरातील प्रत्येक भागातील रुग्णांना ही सेवा मिळावी म्हणून त्या-त्या भागातील रिक्षाचालकांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. 

त्या-त्या भागात रुग्णांच्या मोफत सेवेत तत्पर 

 • सुरेश गायकवाड जय भवानीनगर (9822875244)
 • लक्ष्मण वाघ जय भवानीनगर (9420241215)
 • अशोक शहाणे कामगार चौक लक्ष्मी कॉलनी (9822323198)
 • श्री. कदम शिवाजीनगर (7722060676)
 • श्री. जावेद रोशन गेट (9970787273)
 • शेख फेरोज कटकट गेट (9921817786)
 • विनोद रोकडे फाजलपुरा (7385832870)
 • आनंद भिसे लेबर कॉलनी (9021246211)
 • चरण राजपूत मयूर पार्क (8698415415) 
 • राजेश जाधव कलेक्‍टर ऑफिस (9850590322)
 • श्री. अश्‍पाक रेल्वे स्टेशन (9823807912)
 • शेख अब्दुल रोशन गेट (7620424071)
 • दत्ता सरगर हर्सूल सावंगी (9767977336)
 • सुनील साबळे (9158147909), रवी लोखंडे (9822831665), गणेश बागल बेगमपुरा (9049911299)
 • रवी हाळनोर खोकडपुरा (8669270099)
 • अर्जुन राठोड बीड बायपास (8788817589)
 • जावेद, जुना बाजार (9960116909)
 • निखिल कुलकर्णी हडको (9420376027)
 • सोमनाथ गायकवाड (9673046974), रामेश्वर फुके मयूर पार्क (9922453632)
 • विजय निकम हनुमाननगर (9851987555)
 • रवि शेळके मुकुंदवाडी (8007180050)
 • रमेश कोलते मुकुंदवाडी (8275230266)
 • सागर राजपूत रामनगर (9595059599)
 • लक्ष्मण शेंडगे जवाहर कॉलनी (9595227779)
 • लक्ष्णण सोनवणे गजानननगर (9579388320) 
 • मझहर सादतनगर (9763555781), राजू साळवे समतानगर क्रांती चौक (9764799720),

 

हेही वाचा -   मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? कसे येते मरण

शहरालगतचा परिसर

 • विशाल औसरमल (9673593818, 8788299196), अश्‍पाक, विनोद सागरे एकनाथनगर रेल्वे स्टेशन (9730812308)
 • कलीम सय्यद (9860786682), संजय घागरे (9923372012), आनंद गणराज ( 7972496506) अमोल घुले कांचनवाडी ( 9588655504)
 • कुणाल इंगळे वाल्मी नाका ( 9156624951), सुशील भवर नक्षत्रवाडी( 9852907777)
 • सचिन सोळुंके (8600322118), विष्णू ठोकळ हिंदुस्तान आवास नक्षत्रवाडी ( 8329701366), अजय इंगळे एकनाथनगर (9766694608)  

इच्छुक रिक्षा चालकांना आवाहन

तसेच या सेवाभावी ग्रुपमध्ये सहभागी होऊन सेवा द्यायची असल्यास इच्छुक रिक्षाचालकांनी जिल्हाध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा असे श्री हळनोर यांनी आवाहन केले आहे. 

हेही माहिती करून घ्या : लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad late night free autorikshaw for patients