मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? कसे येते मरण, वाचा...

What is Death, What Happenes Exactly
What is Death, What Happenes Exactly

औरंगाबाद - मृत्यू हे एक शाश्वत सत्य आहे. जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणारच, हे अटळ आहे; पण मनुष्याचा मृत्यू हा एकाएकी होत नाही. डॉक्‍टरांनी 'मृत' म्हणून घोषित केल्यानंतरही आपले काही अवयव कार्यान्वित असतात. मृत्यू होतो तेव्हा सर्वांत अगोदर आणि नंतर कोणता अवयव काम करणे बंद करतो, याबाबत eSakal.com ने वैद्यकीय तज्ज्ञांकडून जाणून घेतलेली खास माहिती. 

आध्यात्मिकदृष्ट्या विचार केला तर मानवी शरीरातून आत्मा निघून जाणे म्हणजे मृत्यू होणे, हे सर्वश्रुत आहे; मात्र याला विज्ञानाची मान्यता नाही. विज्ञानात मृत्यूची व्याख्या वेगळी आहे. याबाबत डॉ. अनिल कावरखे म्हणाले, "साधारणतः कुण्याही व्यक्तीच्या मेंदूचे काम थांबले किंवा मेंदू बंद पडला तर मृत्यू झाला, असे समजले जाते. त्यामुळे 'ब्रेन डेड' घोषित
केलेल्या मृताच्या नातलगांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले जाते. मेंदूचे कार्य पूर्णतः ठप्प होणे हे मृत्यूचे सर्वमान्य लक्षण आहे. त्यामुळेच हृदयक्रिया बंद पडलेल्या आणि डॉक्‍टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्ती, त्यांचा मेंदू बंद पडला नसल्याने काही तासांनी जिवंत झाल्याची
उदाहरणे आहेत. 


 
असा होतो मृत्यू 

मेंदूने काम करणे थांबवले की, हळूहळू शरीराच्या इतर अवयवांचे कामही थांबते. शरीराला प्राणवायूचा (ऑक्‍सिजन) पुरवठा बंद झाला की मेंदू काम थांबवतो. मेंदूने काम थांबवल्याने न्यूट्रॉनचे काम ठप्प होते. मेंदू शरीरातील विविध भागांकडे हार्मोन्स पाठवणे बंद करतो. मांसपेशी, अवयव शिथिल होतात. त्यामुळे काही जणांचे मलमूत्र आपोआप बाहेर येते. रक्तप्रवाह
थांबल्याने शरीर थंड पडून पिवळे पडायला लागते. नाडीचे व हृदयाचे ठोके बंद पडतात. दृष्टी स्थिर होते. शरीरावरील केस ताठ होतात. ही प्रक्रिया दहा ते पंधरा मिनिटांची असते. 

पेशी राहतात जिवंत 

मृत्यूनंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे स्वतंत्रपणे जिवंत राहतात. म्हणूनच मृत्युपश्‍चात अवयवांचे दान करता येते. मृत्यूनंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे स्वतंत्रपणे जिवंत राहतात. म्हणूनच मृत्युपश्‍चात अवयवांचे दान करता येते. 

अचानक होत नाही मृत्यू 

डॉ. कावरखे यांनी सांगितले की, मृत्युपूर्वी किंवा कुठल्याही गंभीर आजारापूर्वी आपले शरीर आपल्याला सूचना देत असते. त्यालाच आपण लक्षणे म्हणतो. ही लक्षणे वेळीच ओळखता आली तर मृत्यू टाळता येतो. एवढेच नाही, तर एकाएकी हृदयविकाराच्या झटक्‍यानेही कुणी मरत नाही. हृदयविकाराच्या झटक्‍याचे संकेत एक ते दीड महिन्यापूर्वीच शरीराला मिळतात. त्यामुळे अचानक मृत्यू आला हे म्हणणेच चुकीचे आहे. केवळ अपघातातच अचानक मृत्यू येऊ शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com