Aurangabad: मलकापुर को-ऑपरेटिव्ही बँकेवर आरबीआयचे निर्बंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malkapur Bank
मलकापुर को-ऑपरेटिव्ही बँकेवर आरबीआयचे निर्बंध

औरंगाबाद : मलकापुर को-ऑपरेटिव्ही बँकेवर आरबीआयचे निर्बंध

औरंगाबाद : भारतीय रिझर्व्ह बँकेने दि मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध आणले आहेत. या बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे आरबीआयने हा निर्णय बुधवारी (ता.२४) घेतला. यामुळे गुरुवारी (ता.२५) शहरातील सहा शाखांत पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. आरबीआयने या बँकेचे क्रेडिट बंद केले असून केवळ दहा हजार रुपये खातेधारकांना काढणार येणार आहेत.

आरबीआयने दिलेल्या सूचनांचे निवेदनही प्रत्येक शाखेबाहेर लावण्यात आले आहे. शहरात या बँकेच्या सहा शाखा आहेत. यातील गुलमंडीवरील शाखा सर्वांत जुनी आहे. को-ऑपरेटिव्ह बँक जुनी असल्याने यात प्रत्येक शाखेत हजारो लोकांची खाती आहेत. आरबीआयने लादलेल्या निर्बंधामुळे खातेधारकांमध्ये घबराटीचे वातावरण असून आपली आयुष्यभराची कमाई बुडते की काय या भीतीने प्रत्येकजण पैसे काढण्यासाठी बँकेत आला होता.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

बँकेच्या शहरात गुलमंडी, मायानगर, सिडको एन-२, जाबिंदा हाईट्स बीड-बायपास, रेल्वेस्टेशन रोड, जवाहर कॉलनी आणि टीव्ही सेंटर येथे शाखा आहे. प्रत्येक शाखेत २ ते ३ हजार ग्राहकांची खाती आहेत. एकूण १० ते १२ हजार खातेदार असल्याची माहिती बँकेतर्फे देण्यात आली आहे. सकाळी बँक उघडण्यापूर्वी ग्राहक बँकेसमोर येऊन थांबले होते. बँक सुरू झाल्यानंतर प्रत्येकाने माझे पैसे मला परत मिळतील ना की ते पैसे बुडतील असा सवाल बँक कर्मचारी आणि शाखा व्यवस्थापकांना केला. बँकेतर्फे आरबीआयच्या निर्देशाप्रमाणेच दहा हजार रुपये पर्यंत रक्कम खातेदारांना देण्यात येत आहे.

मलकापूर बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचे लक्षात घेऊन आरबीआयने हे पाऊल उचलले. रिझर्व्ह बँकेने निवेदन प्रसिद्धीला दिले. मलकापूर नागरी सहकारी बँक कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करणार नाही, कोणतीही गुंतवणूक करणार नाही, कोणतेही दायित्व घेणार नाही आणि आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही पेमेंट करणार नाही, असेही निवेदनात नमूद आहे. बँकेच्या ग्राहकांना दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. बचत आणि चालू खाते अशा दोन्ही ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

आरबीआयच्या निर्देशानुसार क्रेडिट बंद आहे. खातेधारकांना नियमानुसार दहा हजार रुपये देणे सुरू आहे. आरबीआयच्या निर्देशाचे पालन करीत आहोत. खातेधारकांनी घाबरून जाऊ नये. त्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत.

- विनोद अग्रवाल, शाखा व्यवस्थापक, गुलमंडी

loading image
go to top