बारावीत अनुत्तीर्ण विद्यार्थिनीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

औरंगाबाद - बारावीच्या परीक्षेतील अपयशामुळे नैराश्‍य आल्याने मनीषा भाऊसाहेब गायकवाड (वय 18, रा. संघर्षनगर, औरंगाबाद) या विद्यार्थिनीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी मुकुंदवाडी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर घडली.

मनीषा ही मनमाड येथील एका महाविद्यालयामध्ये बारावीत होती. बारावीच्या निकालाचे दडपण तिच्यावर आधीपासून होते. आज दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल आला. चार गुण कमी मिळाल्यामुळे अनुत्तीर्ण झाल्याची बाब समजताच मनीषा हतबल झाली. तिने कुटुंबीयांना मैत्रिणीकडे जाऊन येते, असे सांगितले व मुकुंदवाडी रेल्वे स्थानकालगतच्या ट्रॅकवर हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजरसमोर तिने उडी घेतली. यात ती गंभीर जखमी झाली. मुकुंदवाडी ठाण्याचे जमादार डी. डी. जाधव यांनी तिला घाटीत दाखल केले. परंतु, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. मनीषाच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असून, तिचे वडील कंपनीत काम करतात.

Web Title: aurangabad marathwada girl student suicide