‘घाटी’ला औषधींसाठी हवा दहा कोटींचा निधी!

‘घाटी’ला औषधींसाठी हवा दहा कोटींचा निधी!

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (घाटी) २०१७-१८ वर्षासाठी मिळालेल्या पाच कोटींच्या निधीतून चार कोटी ८५ लाख रुपयांची देणी चुकती करण्यात आली. शिल्लक पंधरा लाख रुपयांत मार्च २०१८ पर्यंत औषधीपुरवठा करणे घाटीसमोर आव्हान आहे. त्यामुळे डिसेंबरच्या अंतरिम बजेटसाठी पाच कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य औषधी भांडारचे प्रमुख डॉ. के. सी. चंडालिया यांनी दिली. दरम्यान, मागील थकबाकी आणि चालू वर्षातील औषधपुरवठा सुरळीत करण्यासाठी दहा कोटींची नितांत गरज असल्याचे औषधनिर्माणशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. एम. डोईफोडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

घाटीवर मराठवाड्यासह विदर्भ आणि खान्देशच्या जिल्ह्यांचाही भर आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता घाटीच्या औषधालयावर ताण पडतो आहे. त्यामुळे अनेक औषधी रुग्णांना बाहेरून खरेदी करण्याची वेळ येत आहे. खाटांची संख्या कमी असली तरी गोरगरीब रुग्ण आशेने घाटीत उपचारासाठी येतात. त्यामुळे घाटी रुग्णालयही उपचार करते; परंतु औषधांच्या कमतरतेने त्यांनाही नाईलाजाने बाहेरून औषधी द्यावी लागते; परंतु पेशंट आणि नातेवाईक एकंदर परिस्थिती लक्षात घेत नसल्याने घाटीत प्रसंगी वाद होतात. त्यामुळे घाटीची प्रतिमा डागळली जात आहे, याबद्दल डॉ. चंडालिया यांनी खंत व्यक्त केली.

लाईफ सेव्हिंग ड्रग्सचा पंधरा दिवसांचा साठा 
मधुमेहसाठीच्या मेटफोर्मिन या गोळ्या आणि प्लेन इन्सुलिन, अँटी रेबीज व्हॅक्‍सिन (एआरव्ही), हायर ॲण्टीबायोटिक्‍स, मानसोपचारचे रिस्पेरिडोनचा घाटीत तुटवडा असून त्याच्या पर्यायी औषधांवर घाटीचे औषधालय सुरू आहे. आवश्‍यक असेलल्या २५० औषधी उपलब्ध आहेत; मात्र त्यांचा साठा मर्यादित आहे. काही औषधे आवश्‍यक आहेत; पण त्या औषधी उपलब्ध नसल्याने बाहेरून खरेदी करावे लागतात.

...म्हणून तुटवडा
२०१५-१६ या वर्षासाठी तीन कोटी मिळाले होते. त्यावर्षी सहा कोटींची औषधी लागली होती. २०१६-१७ ला चार कोटी मिळाले; परंतु खर्च साडेसात कोटी झाला. २०१७-१८ मध्ये तीन कोटी मिळाले. यंदा मार्चपर्यंत आठ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मागील बाकी आणि निधीच्या तुटवड्यामुळे पुरवठादार औषधींच्या पुरवठ्याला हात आखडता घेतात. त्यामुळे हा तुटवडा निर्माण होतो.

वर्ष                            रुग्णसंख्या
              बाह्यरुग्ण विभाग     आंतररुग्ण विभाग

 २०१४     ५ लाख ६० हजार ६४२     ६७ हजार १९२
 २०१५     ५ लाख ९५ हजार ८३६    ७१ हजार ४६८
 २०१६     ६ लाख ५५ हजार ३३३    ८० हजार ८०३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com