उत्तरपत्रिका फेरतपासणीसाठी दहा हजार अर्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेचा निकाल लागल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उत्तपत्रिकांच्या फेरतपासणीसाठी दहा हजार अर्ज आले आहेत. २० सप्टेंबरपर्यंत पेपर तपासून निकाल लावावा लागणार आहे.

औरंगाबाद - पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेचा निकाल लागल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उत्तपत्रिकांच्या फेरतपासणीसाठी दहा हजार अर्ज आले आहेत. २० सप्टेंबरपर्यंत पेपर तपासून निकाल लावावा लागणार आहे.

आधीच रखडलेले निकाल त्यानंतर घसरलेली टक्‍केवारी पाहता, विद्यापीठात उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्यासाठी विद्यार्थी संख्या वाढत आहे. कॅरिऑनच्या निर्णयाने नापास विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत आहे. विज्ञान शाखेतील पदवीच्या विद्यार्थ्यांचे फेरतपासणीसाठी सहा हजारांहून अधिक अर्ज आहेत. तर औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांचा निकाल दुसऱ्यांदा लावण्यात आला आहे. पहिल्या निकालात जे उत्तीर्ण होते ते दुसऱ्या निकालात नापास दाखवले जात आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी नाराजी व्यक्‍त करीत आहेत. तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगत हात झटकले. पदवी आणि पदव्युत्तर निकाल जाहीर करण्यास विलंब झाला होता. तीन ते साडेतीन महिन्यांनंतर निकाल जाहीर करण्यात आले. काही विषयांचे निकाल पुन्हा पडताळून पाहण्याची गरज असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. उत्तरपत्रिका फेरतपासणीसाठी दहा हजार अर्ज आले आहेत. या अर्जांची येत्या २० सप्टेंबरपर्यंत तपासणी होईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी सांगितले. 

पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेसाठी वजा गुणांकन पद्धत राबविल्यामुळे पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले होते. अवघा तीन टक्के निकाल लागल्यामुळे वाद सुरू झाला होता. विद्यार्थ्यांचा रोष वाढल्यानंतर वजा गुणांकन पद्धत रद्द करून निकाल घोषित करण्यात आले. हा निकाल वेबसाइटवर जाहीर झाला आहे, मात्र गुणपत्रिका नसल्यामुळे दीड हजार विद्यार्थी विचारणा करीत आहेत.

Web Title: aurangabad marathwada news 10000 form for recheaking