औरंगाबाद - व्यावसायिकाकडे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने कंपनीच्या नावे बॅंकेत बनावट खाते उघडून, तसेच पुरविलेल्या साहित्यांची विक्री करून 13 लाख 98 हजार 792 रुपये हडपले. याप्रकरणी संशयिताविरुद्ध सिटी चौक ठाण्यात सोमवारी (ता. 20) गुन्ह्याची नोंद झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमानुल्लाखान मुस्तफाखान (रा. गणेश कॉलनी) असे फसवणूक करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणात संदीप मानसिंगराव कोंडेदेशमुख (रा. खेड शिवापूर, ता. हवेली जि. पुणे) यांनी तक्रार दिली. त्यांची कंपनी असून, औरंगाबादेत अमानुल्लाखान हा सेल्स सपोर्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहत होता. कंपनीकडून देण्यात आलेल्या दहा लाख 48 हजार 250 रुपयांच्या साहित्याची त्याने विक्री केली. विक्रीची रक्कम त्याने परस्पर हडप केली.
|