तीन विमानांना तासाभराचा उशीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - पावसाने मुंबई विमानतळची धावपट्टी सुरू झाली असली तरीही विमानसेवेवर गुरुवारीही (ता. २१) परिणाम झाला. औरंगाबादला येणाऱ्या तीन विमानांना अर्धा ते एक तास उशीर झाला.  

औरंगाबाद - पावसाने मुंबई विमानतळची धावपट्टी सुरू झाली असली तरीही विमानसेवेवर गुरुवारीही (ता. २१) परिणाम झाला. औरंगाबादला येणाऱ्या तीन विमानांना अर्धा ते एक तास उशीर झाला.  

मुंबईत मंगळवारी (ता. १९) सुरू झालेल्या मुसळधार पावसाने विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचले. त्यातच स्पाईस जेटचे विमान धावपट्टीवर रुतून बसले. त्यामुळे अनेक विमाने रद्द करावी लागली होती. चिखलात रुतलेले विमान हटवण्यात यश आल्यानंतर बुधवारी (ता. २१) विमानसेवेला पुन्हा प्रारंभ झाला. असे असले तरीही विमानाच्या वेळापत्रकावर मात्र परिणाम झाला आहे. दुसऱ्या दिवशीही मुंबईहून येणारे सायंकाळी ०५.३५ वाजता मुंबईहून औरंगाबादला येणारे जेट एअरवेजचे विमान (क्र. ९ डब्ल्यू ७१४८) तब्बल एक तास पाच मिनिट उशिराने औरंगाबादला पोचले. तर एअर इंडियाचे सायंकाळी ५.०५ वाजता येणारे मुंबई-औरंगाबाद विमान (क्र. ए-१-४४२) हे विमान अर्धा तास उशिराने आले. त्याचप्रमाणे जेटलाईटचे मुंबई औरंगाबाद (क्र. ४५११) हे विमान एक तास पाच मिनिट उशिराने आले.

Web Title: aurangabad marathwada news 3 aeroplane late by rain