औरंगाबाद जिल्ह्यातील ४० शाळा बंद

औरंगाबाद जिल्ह्यातील ४० शाळा बंद

औरंगाबाद - शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता खालावल्याने आणि पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील ४० शाळा बंद करण्यात आल्या आहेत. याविषयी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे जवळच्या चांगल्या गुणवत्तेमुळे पटसंख्या वाढत असलेल्या शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामळे तुलनात्मकरीत्या चांगली गुणवत्ता असलेल्या शाळांची पटसंख्या वाढत आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी ० ते १० अशी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून येथील विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे एक किलोमीटर अंतरावरील, तर उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तीन किलोमीटरवरच्या शाळेत समायोजन करण्यात आले आहे. शाळा बंद केल्यानंतर त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजनही करण्यात आले आहे. या ४० शाळा बंद केल्याने ८० शिक्षक अतिरिक्‍त ठरले असून या शिक्षकांचेही समायोजन करण्यात आले आहे. 

जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ९० शाळा होत्या, चार शाळा यापूर्वीच बंद झालेल्या आहेत. आता आणखी ४० शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या २ हजार ४६ वर आली आहे. शाळा बंद झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. दोन) जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शालेय समितीची बैठक झाली. या बैठकीत गुणवत्ता व पटसंख्या घसरल्याने शाळा बंद होत असल्याबद्दल चिंता व्यक्‍त करण्यात आली. शाळांची गुणवत्ता राखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करून तपासणीचे आदेश दिले. 

कन्नड तालुका - म्हसोबावाडी दहिगाव, गणेशनगर टाकळी अंतुर, तलावाडी, काळेवस्ती चिंचखेडा बुद्रुक, करंजखेडा जहागीर, जिल्हा परिषद शाळा आदिवासी करंजखेडा जहागीर, धरणवाडी दहिगाव, सारंभावाडी दिगाव, गव्हाळवाडी दिगाव. 

सिल्लोड तालुका - गरुडवाडी देऊळगाव बाजार, धारेश्‍वरवाडी धानोरा, चव्हाणवाडी पिंपळदरी, रानमळा नानेगाव, सिरसाळा तांडा, मुर्डेश्‍वरवस्ती केळगाव,  संत गाडगेबाबा वस्ती जांभई, मेवातीवस्ती डोंगरगाव, सोमासेवस्ती आमठाणा, गोपालवाडी मोढा, भवानीनगर लोणवाडी, मिरगेवाडी उपळी, शेजूळवाडी उपळी, परदेशीवाडी अंभई, शेखलाल लोणवाडी, तपोवनवस्ती पळशी, गुंजाळवाडी माडगाव, सावंतवाडी आमठाणा, गणेशवाडी उपळी, मनोबावाडी रजाळवाडी. 

वैजापूर तालुका - असतानबाबा वस्ती जरूळ, पवार शेवाळे वस्ती बोरसर. 
गंगापूर तालुका - शंकरपूर महालक्ष्मीखेडा बोरुडी, गायरान वस्ती शाळा शहापूर, वाकी वस्ती अंबेलोहळ (कासोडा).

फुलंब्री तालुका - जिल्हा परिषद शाळा जोतेगाव फाटा, अहिल्यादेवी वस्ती सुल्तानवाडी, जाधव वस्ती वानेगाव.

औरंगाबाद तालुका - राहुल प्राथमिक शाळा औरंगाबाद.
पैठण तालुका - जिल्हा परिषद शाळा निलजगाव तांडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com