कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

औरंगाबाद - भरधाव कंटेनरच्या पाठीमागील चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू झाला. सोमवारी (ता. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात आरटीओ कार्यालयाजवळ झाला. 

औरंगाबाद - भरधाव कंटेनरच्या पाठीमागील चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू झाला. सोमवारी (ता. २६) रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात आरटीओ कार्यालयाजवळ झाला. 

बाबा पेट्रोलपंपाकडून रेल्वेस्टेशन मार्गे बीड बायपासकडे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कंटेनर (क्र. एमएच-१४-सीपी-३७६५) जात होता. त्यावेळी बन्सीलालनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकात आरटीओ कार्यालयाच्या जवळ दुचाकीस्वार (क्र. एमएच-२८-यु-८४३६) कंटेनरच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडला. हा अपघात एवढा भयावह होता की, यामध्ये दुचाकीस्वाराच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. वेदांतनगर पोलिस चौकीचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यांनी दुचाकीस्वाराचा मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला. दुचाकीस्वाराची ओळख उशिरापर्यंत पटली नव्हती. ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.

Web Title: aurangabad marathwada news accident