सभापतींसमोर ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

औरंगाबाद - जयभवानीनगरात भूमिगत गटार योजनेअंतर्गत ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी दीड महिन्यांपूर्वी नाल्याचे खोदकाम करण्यात आले असून, घाण पाणी घरात घुसत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. वारंवार पाठपुरावा करून देखील अधिकारी दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या सदस्या मनीषा मुंडे यांनी बुधवारी (ता.२४) स्थायी समितीच्या बैठकीत सभापतींच्या आसनासमोर ठिय्या दिला. सभापतींनी येत्या दोन दिवसांत काम सुरू करण्याचे प्रशासनाला आदेश दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. 

जयभवानीनगरात भूमिगत गटार योजनेअंतर्गत मुख्य मलजलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम नाल्यातील अतिक्रमणामुळे रखडले होते. वारंवार मागणी केल्यानंतर प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी नाल्यातील अतिक्रमणे हटविली. त्यानंतर काम सुरू करण्यात आले. नाला खोदण्यात आला असून, ५० टक्‍के काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांपासून कंत्राटदाराचे कर्मचारी येथे फिरकलेही नाहीत. नाल्यात मोठ्याप्रमाणात मलबा पडलेला असल्याने पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसत आहे, असे मनीषा मुंडे यांनी सांगितले. पाठपुरावा करूनही अधिकारी दखल घेत नाहीत, तर दुसरीकडे नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे काम सुरू झाल्याशिवाय तुमच्या आसनासमोरून उठणार नाही, असा इशारा देत श्रीमती मुंडे यांनी सभापती श्री. बारवाल यांच्यासमोर ठिय्या दिला. राजू वैद्य यांनी देखील काम थांबल्याने नागरिकांचे हाल सुरू असल्याचा आरोप केला. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांनी दहा दिवसांपासून काम बंद आहे, काही ठिकाणी काम करताना अडथळे येत असल्याचा खुलासा केला. त्यावर सभापतींनी येत्या दोन दिवसात काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर श्रीमती मुंडे आपल्या जागेवर जाऊन बसल्या.

Web Title: aurangabad marathwada news agitation dranage line