अमेरिकन कंपनीचा ई-मेल हॅक करून उद्योजकाला गंडविले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - अमेरिकन कंपनीचा ई-मेल हॅक करून कंपनीचे ग्राहक असलेल्या उद्योजकाला सायबर भामट्याने बनावट मेल पाठविला. कंपनीचे खाते क्रमांक बदलल्याची खोटी बाब नमूद करून स्वत:चा खातेक्रमांक देऊन उद्योजकाला पैसे भरण्यास सांगितले व सोळा लाख वीस हजार २५० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात सायबर भामट्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात रविवारी (ता. पाच) गुन्ह्याची नोंद झाली.

साईनाथ रंगनाथ आहेर (वय ५६) हे सिडको एमआयडीसीतील ब्लुबेल हाऊसिंग सोसायटीत राहतात. ते ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहेत.

त्रिमूर्ती एंटरप्रायझेस या त्यांच्या कंपनीमार्फत वाहनांना गॅसकिट पुरविण्याचा व्यवसाय केला जातो. गत दहा वर्षांपासून ते गॅसकिटसंबंधित कच्चा माल अमेरिकेतील इंटरफेस परफार्मन्स मटेरियल या कंपनीकडून आयात करतात. दहा ऑक्‍टोबरला त्यांना ते व्यवहार करीत असलेल्या इंटरफेस परफार्मन्स मटेरियल या कंपनीच्या नावाने एक मेल आला. यात कंपनीने खाते क्रमांक बदलला असून जुन्याऐवजी नवीन खातेक्रमांकावर व्यवहाराची रक्कम भरणा करावी असे नमूद होते. त्यांनी लगेचच मेलवर नमूद खात्यात २५ हजार आठशे ९५ अमेरिकन डॉलर अर्थात सोळा लाख २० हजार २५० रुपयांची रक्कम भरणा केली. व्यवहारानंतर कंपनीकडून काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी कंपनीशी संपर्क साधला. त्या वेळी कंपनीने कोणताही नवीन खातेक्रमांक दिला नसून जुनाच खातेक्रमांक कायम असल्याचे त्यांना सांगितले. कंपनी व आहेर यांनी अधिक माहिती घेतल्यानंतर इंटरफेस परफार्मन्स मटेरियल या अमेरिकन कंपनीचा ई-मेल हॅक झाल्याची बाब समोर आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.

सायबर भामटा परदेशातील
या प्रकरणी आहेर यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. तपास केल्यानंतर भामट्याने परदेशातून ई-मेल हॅक केला व रक्कम हडपल्याची बाब समोर आली.

असा घडला प्रकार...
परदेशातील सायबर भामट्याने इंटरफेस परफार्मन्स मटेरियल कंपनीचा ई-मेल हॅक केला. त्यानंतर एक फेकमेल औरंगाबादेतील उद्योजकाला पाठविला. त्याने स्वत:चाच खातेक्रमांक देऊन तो अमेरिकन कंपनीचा असल्याचे भासवले. कंपनीने मेल केल्याचे समजून आहेर यांनी भामट्याच्या खात्यात रक्कम भरणा केली.

Web Title: aurangabad marathwada news The American company hacked the e-mail to entrepreneur