अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून संपावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - मानधन वाढवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. ११) बेमुदत संप पुकारला आहे. आयटकच्या नेतृत्वात राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर जाणार आहेत. तर मंगळवारी (ता. १२) मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनचे प्रा. राम बाहेती यांनी सांगितले.

राज्य शासनाने मानधनवाढीसाठी ऑगस्ट २०१६ मध्ये समिती गठित केली होती. या समितीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता व शिक्षणाधारित मानधनवाढ देण्याची किंवा मानधनात दुपटीने वाढ करण्याची शिफारस ९ मार्च २०१७ रोजी शासनाकडे केली. परंतु अद्याप मानधनात वाढ झाली नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. आयटकसह सर्व संघटनांच्या कृती समितीतर्फे हा संप होणार असून मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. आझाद मैदानावर निदर्शने करण्यात येतील.

जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ११ सप्टेंबरपासून अंगणवाड्या बंद ठेवाव्यात, मासिक अहवाल देऊ नयेत, बैठकांना जाऊ नये तसेच मुंबई मोर्चासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. बाहेती, अनिल जावळे, विलास शेंगुळे, तारा बनसोडे, शालिनी पगारे, माया भिवसाने, मीरा अडसरे, शीला साठे, चंचल खंडागळे, सुनीता शेजवळ, शन्नो शेख, रफअत सिद्दीकी, रंजना राठोड, आलमनूर शेख, कांता भोजने आदींनी केले आहे.

Web Title: aurangabad marathwada news anganwadi employee on strike