सहायक विक्रीकर आयुक्तांच्या पत्नीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

औरंगाबाद - सहायक विक्रीकर आयुक्तांची पत्नी गीतांजली हेमंत गांगे (वय 36, रा. देवानगरी) यांनी आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. देवानगरीत ही घटना बुधवारी सकाळी उघड झाली. गांगे या सिंचन विभागात वरिष्ठ लिपिक होत्या.

पोलिसांनी सांगितले, की गीतांजली व हेमंत गांगे यांची स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान ओळख झाली होती. यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला. त्यांना आठ वर्षांचा मुलगा आहे. आज सकाळी हेमंत गांगे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी घराबाहेर पडले. त्या वेळी घरात गीतांजली एकट्याच होत्या. यातून त्यांनी घरातील एका खोलीत गळफास घेतला. पोलिसांना गीतांजली यांनी मुलगा व पतीच्या नावे लिहिलेली चिठ्ठी आढळली. आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा मजकूर चिठ्ठीत आहे. या घटनेची नोंद उस्मानपुरा पोलिस ठाण्यात झाली.

Web Title: aurangabad marathwada news assistant sales tax commissioner wife suicide