जपानी बोगदातज्ज्ञांनी तपासला औट्रमचा खडक

जपानी बोगदातज्ज्ञांनी तपासला औट्रमचा खडक

औरंगाबाद - मराठवाड्याच्या ‘कनेक्‍टिव्हिटी’चा महत्त्वाचा दुवा ठरू शकणाऱ्या औट्रम घाटाच्या खडकाची गुरुवारी (ता. १४) पाच सदस्यीय जपानी ‘टनेल एक्‍स्पर्ट’ टीमने तपासणी केली. सात किलोमीटरची अलाईनमेंट अंतिम केल्यानंतर झालेली ही पाहणी औट्रम बोगद्याच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 

मराठवाड्याला उत्तर भारताशी जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या औट्रम घाटाच्या बोगद्याची पाहणी या पथकाने केली. या घाटाची रेखांकन अंतिम करण्यात बराच अवधी गेल्यानंतर या सात किलोमीटर लांबीच्या बोगद्याची निर्मिती अंतिम झाली आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीनंतर या बोगद्याच्या निर्मितीपूर्वी करावी लागणारी खडक तपासणी सध्या सुरू आहे.

गुरुवारी पाच जणांच्या टीमने खडकाच्या नमुन्यांची तपासणी केली. बोअर करून काढण्यात आलेल्या खडकांच्या नमुन्यांची तपासणी करून त्यांच्याविषयीचे मत हे तज्ज्ञ रस्ते विकास मंत्रालयाला कळवणार आहेत.
या पथकात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकास मंत्रालयाने नेमलेल्या ४ जपानी तज्ज्ञांचा समावेश होता. त्यांच्यासह एनएचएआयचे विभागीय अधिकारी एम. चंद्रशेखर, प्रकल्प संचालक अजय गाडेकर, महेश पाटील, राहुल पाटील, आशिष देवतकर यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com