आता पुणे आणि बंगळुरुचे हेलपाटेही वाचणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - येथील २८ उद्योजकांच्या एकत्रित येण्याने स्थापन झालेल्या इलेक्‍ट्रॉनिक क्‍लस्टरच्या ‘सेंट्रल फॅसिलिटी सेंटर’च्या  पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन सोमवारी (ता. १६) शेंद्रा येथे सकाळी नऊ वाजता विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. देशातील हे पहिलेच केंद्र ठरणार असून, येथून नव्या संशोधनाला चालना मिळेल. शिवाय येथील उद्योजकांचे पुणे आणि बंगळुरुचे हेलपाटेही वाचणार आहेत, अशी माहिती सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी दिली.

भूमिपूजन कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. श्री. कोकीळ म्हणाले, ‘‘या क्‍लस्टरसाठी देवगिरी इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्‍लस्टर प्रा. लिमिटेड ही स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्यात आली असून, या केंद्राची एकूण किंमत २८.५८ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. यासाठीची ७५ टक्के रक्कम केंद्र सरकार, १० टक्के रक्कम राज्य सरकार आणि १५ टक्के रकमेची उद्योजक गुंतवणूक करणार आहेत. सुमारे सव्वादोन वर्षांच्या कालावधीत हे केंद्र मंजूर झाले आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. या वेळी गौतम नंदावत, आशिष गर्दे, सुरेश तोडकर यांची उपस्थिती होती.

हा होणार फायदा
या नव्या केंद्रामुळे औरंगाबादेत कार्यरत इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रक्षातील उद्योगांना प्रॉडक्‍ट आणि त्याचा प्रोटोटाईप तयार करता येणार आहे. बाजारात ते उत्पादन आणण्यासाठी ते उत्पादन क्षमता उद्योगांना प्रदान करता येणार आहे. तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनाची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळेची निर्मिती येथे करण्यात येईल. निर्यात करण्याची क्षमता असलेल्या उत्पादनांच्या मॉड्युलर कॅबिनेटचे डिझाइन तयार करतानाच कुशल कामगारही घडविता येणार आहे.

Web Title: aurangabad marathwada news central facility center